लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी हातमिळवणी करून ते आघाडीत सहभागी झाले तर जी आघाडीची भूमिका असेल तीच आमच्या पक्षाची भूमिका एक घटक पक्ष म्हणून राहणार असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मोर्शीमधील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रामदास आठवले नागपुरात आल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात महायुती झाल्यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आमची लढाई असून राज्यात महायुतीचे आणि केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात भगवा-निळा सप्ताह हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत गावागावात सभा, मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. दोन्ही समाजाने एकत्र यावे, हा त्या मागील उद्देश असल्याचे आठवले म्हणाले. २५ फेब्रुवारीला मुंबईला राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
पवारांबाबत आघाडीच्या भूमिकेशी सहमती -आठवले
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी हातमिळवणी करून ते आघाडीत सहभागी झाले तर
First published on: 01-02-2014 at 02:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agreed on nda role over sharad pawar ramdas athawale