चिपळूण : कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात काम करीत असणाऱ्या प्रत्येकाला दापोली कृषी विद्यापीठ व  तुम्हा सर्वांची साथ मिळावी,  अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी चिपळूण येथे व्यक्त केली. वाशिष्ठी डेअरीचा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाशिष्ठी डेअरीतर्फे चिपळूण बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन कृषी महोत्सव २०२५ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. 

यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले,  वाशिष्ठी डेअरीचा कृषी महोत्सव अतिशय आनंददायी असून शेतकऱ्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न होत आहे. पशुसंवर्धन व दुग्ध क्षेत्रात ते जे काम करीत आहेत, ती एक प्रकारची क्रांती आहे. आपण केंद्रीय कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी देशात धान्य आयात करावे लागत होते. मात्र, नंतर देशातील शेती फायदेशीर कशी होईल ?  या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले गेले.  यामध्ये कृषी क्षेत्रात आधुनिकता, नवीन तंत्रज्ञान याचा उपयोग करून शेतकऱ्यांचे हित जोपासून देश कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिल, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामुळे भारत देश तांदूळ उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश बनला.

IFS, UPSC, girl opt IFS, IAS IPS, Vidushi Singh,
आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girish Mathrubootham Former CEO of Freshdesk 12th fail businessman who earned 334 crore rupees just in seven days know his success story
७ दिवसात ३४० कोटींची कमाई! बारावी नापास झालेली ‘ही’ व्यक्ती नेमका कोणत्या प्रकारचा व्यवसाय करते? जाणून घ्या
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Satara District Collector Jitendra Dudi has been posted as Pune District Collector pune news
एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार; जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
Mahayuti Candidate List vs Maha Vikas Aghadi Candidate List in Marathi
Mahayuti vs Maha Vikas Agahdi Candidate : उद्या मतदान, तुमच्या मतदारसंघातील उमेदवार जाणून घ्या!

हेही वाचा >>> Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

कालांतराने भारत देश धान्य निर्यातीत १८ व्या क्रमांकाचा बनला. शेतीसाठी पाणी नियोजनाची गरज आहे. तसेच उत्तम बी- बियाणे असली पाहिजेत. शेतीबरोबर पशुपालन हा जोडधंदा केला पाहिजे. तरच शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकतो. कृषी महोत्सवासाठी मोठी जागा घेऊन  स्टॉलच्या बाजूला नवीन भात बी-बियाणांच्या जातीची पेरणी करून ते पीक कसे येते ?  याची माहिती त्यांनी दिली तर शेतकरी अधिक जोमाने कृषी क्षेत्रात काम करेल, असा सल्ला दिला.  कोकणात मत्स्य, कृषी पशु, दुग्ध क्षेत्रात मोठी संधी आहे.  कोकणचा चेहरा मोहरा बदलतोय तो आणखी बदलेल आणि कोकणचा भाग संपन्न होईल. या भागाचा नावलौकिक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, साधारण निवडणुका झाल्या की नेत्याची थांबण्याची मानसिकता असते. मात्र, प्रशांत यादव यांनी दुप्पट जोमाने कार्य सुरू केले आहे. त्यांनी उत्तम वाशिष्ठी दूध संस्था त्यांनी उभारली आहे. कृषी महोत्सवाद्वारे कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, समृद्ध पशुधन शेतकऱ्यांना पाहता आले. त्यासोबतच बचत गटातील भगिनींना व्यासपीठ मिळवून देत न्याय देण्याचे काम केले.  त्यामुळे कृषी महोत्सवाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी प्रगतशील शेतीचा मार्ग अवलंबवावा असे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार भास्कर जाधव, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे नेते बशीर मूर्तुझा, सत्यजित पाटणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक बबन कनावजे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने,  नलिनी भुवड, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, ऍड. नयना पवार आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक  स्वप्ना यादव यांनी स्वागत केले.

तांत्रिक बिघाडाने हेलिकॉप्टर हवेतच चिपळूण येथे दौ-यावर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार कार्यक्रम संपवून हेलिकॉप्टरने पुन्हा निघाले असता तांत्रिक बिघाडाने त्याचे हेलिकॉप्टर हवेतच वीस मिनिटे वर खाली करु लागले. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र हा प्रकार हेलिकॉप्टरमध्ये जास्त वजन असल्याने घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शरद पवार यांच्या अंगरक्षकांना खाली उतरविल्यानंतर हे हेलिकॉप्टर रवाना  करण्यात आले.

Story img Loader