जैवविविधता, निसर्गसंपन्नता आणि दळणवळणाची सोय या दृष्टीने सातारा जिल्’ह्यत कृषि विद्यापीठ स्थापन करणे सोयीचे आहे. तेंव्हा, हे विद्यापीठ स्थापन करावे आणि पुणे येथे असलेले बटाटय़ाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र साता-यात स्थलांतरित करावे, अशी मागणी खा.उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली.या बाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले आहे.
म.फुले कृषी विद्यापीठ आणि डॉ.पंजाबराव कृषि विद्यापीठाची व्याप्ती पहाता या विद्यापीठांचे विभाजन करण्याचे ठरले आहे. त्यानुसार म.फुले विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या नऊ जिल्हय़ापकी हे विद्यापीठ कुठे स्थापन करायचे यासाठी डॉ.यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.त्यानुसार जिल्हयात कृषि महाविद्यालय, गहूगेरवा संशोधन केंद्र,उस संशोधन केंद्र,अन्न प्रक्रिया संस्था, दूध संस्था,पशू महाविद्यालय आहे.महामार्ग उपलब्ध आहेत.सहकारी साखर कारखाने आहेत, त्यांमुळे विद्यापीठासाठी जागा आम्ही देऊ, मात्र विद्यापीठ सातारा जिल्’ह्यत स्थापन करा अशी मागणी खा.भोसले यांनी केली आहे.

Story img Loader