अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या ढाल-तलवार या चिन्हाला शीख समाजाने विरोध दर्शवला आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे. या चिन्हाबाबतच्या शंकांचं निरसन निवडणूक आयोग करेल, असे सांगतानाच सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर मशालीवरून टीकास्र डागलं आहे. “आम्ही मागितलेली ढाल-तलवार आम्हाला मिळाली. दुसऱ्यांना आग लावण्यासाठी मशालही मिळाली”, असा खोचक टोला सत्तार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Swords and Shield Symbol: शिंदे गटाच्या ‘ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध, निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र

शिंदे गटाची ढाल ईडीची आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचा प्रश्न पत्रकाराने सत्तार यांना विचारला. “आमची ढाल छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. स्वराज्यातील जनतेला आणि गडकिल्ल्यांना महाराजांनी ढाल-तलवारीनेच संरक्षण दिलं होतं. ही ढाल-तलवार ईडीची असू शकत नाही. त्यावेळी ईडी नव्हती”, असं प्रत्युत्तर सत्तार यांनी दिले आहे.

“उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे तुमचीही…” म्हणत आदित्य ठाकरेंनी घेतला वक्तव्याचा समाचार

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत कोण विजयी होणार हे जनता ठरवेल. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास या निवडणुकीच्या प्रचारात उतरेल, असे सत्तार यांनी सांगितले आहे. बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाला युतीची ऑफर दिली आहे. यावर “प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंचं हिंदूत्व मान्य असेल, तर पुढच्या निवडणुकीसाठी त्यांचं काहीतरी नियोजन असेल”, असे सत्तार म्हणाले आहेत.

‘शिवसेनेचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही’, नारायण राणेंच्या विधानावर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले “अशा लोकांकडे…

प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंचं हिंदूत्व मान्य कसं झालं? याबाबत तज्ज्ञांनी चिंतन करायला पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे. सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राहतील, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture minister abdul sattar commented on uddhav thackeray dhal talwar mashal symbol and andheri east bypoll rvs
Show comments