अहिल्यानगरः पाच वर्षे वयाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने केसा उर्फ किशोर विजय पवार (२७, आरडगाव, राहुरी) यास २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद तसेच विविध कलमान्वये सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी या खटल्याचा निकाल आज, गुरुवारी दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील वैशाली राहुल राऊत यांनी युक्तिवाद केला. दि. १८ जून २०२२ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पीडित ५ वर्षे वयाची बालिका घरासमोर खेळत असताना केशा उर्फ किशोर पवार याने जवळच असलेल्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, नंतर तिच्याच कपड्यांनी गळा वळून तिच्या खुनाचा प्रयत्न केला.

यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ६ अन्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सज्जनकुमार नरेडा व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केला व न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकारतर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलीची आई, बहीणसह वयाच्या संदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने पाच वर्ष मुलीची साक्षरही ग्राह्य धरली.

युक्तिवाद करताना सरकारी वकील वैशाली राऊत यांनी सांगितले की, घटनेवेळी पीडित मुलगी पाच वर्षांची होती. कमी वयात घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होतो. त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावर पडतात. आरोपींनी अत्यंत वाईट पद्धतीने गुन्हा केल्यामुळे जर त्याला खटल्यातून निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून, लहानग्या मुलींवर अशा घटना पुन्हापुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करावी.