कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायकपैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथे गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनाधिकृत थडगे उभारण्यात आले होते. काल अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप व श्रीराम प्रतिष्ठान या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सागर बेग यांच्या उपस्थितीमध्ये सकल हिंदू संघटनेच्या युवकांनी हे वादग्रस्त थडगे जमीनदोस्त केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आले. प्रचंड मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते. मोठा पोलीस बंदोबस्तदेखील यावेळी ठेवण्यात आला होता.
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रवेशद्वाराच्या जवळच अनाधिकृत थडगे बांधण्यात आले होते. या थडग्याला कोणताही कायद्याचा आधार न घेता काही लोक प्रशासनाला वेठीस धरत होते. या बेकायदेशीर थडग्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. यामुळे ते तात्काळ त्या ठिकाणाहून हटवावे अशी मागणी सकल हिंदू समाज कर्जत तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली होती. मागणी करूनही प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्यामुळे अखेर काल १६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आमदार संग्राम जगताप व सागर बेग हे सिद्धटेक येथे या वादग्रस्त थडगे असलेल्या ठिकाणी भेट देणार होते. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता.
संग्राम जगताप यांची सर्वप्रथम कर्जत शहरांमधून भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर ग्रामदैवत गोदड महाराज यांचे दर्शन घेऊन ही रॅली थेट सिद्धटेक येथे पोहोचली. त्या ठिकाणी पोहोचल्यावर युवकांनी ते वादग्रस्त थडगे स्वतःच पाडून टाकले. या ठिकाणी असणारे काठ्या व इतर साहित्याच्या मदतीने थडगे व त्यावरील पत्रे ,भिंती या नष्ट करण्यात आल्या. आणि ते जमीनदोस्त करण्यात आले .यावेळी आमदार संग्राम जगताप व सागर बेग हे उपस्थित होते. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर कर्जत येथील कापरेवाडी वेस येथे असणाऱ्या मारुती मंदिराच्या ठिकाणी महाआरती करण्यात आली.
आमदार संग्राम जगताप पत्रकारांशी बोलताना म्हणाली की, यापुढे ज्या ठिकाणी आली तेथे असणार बजरंग बली, सिद्धटेक येथील वादग्रस्त थडगे काढावे अशी मागणी सकल हिंदू समाज यांच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. मंदिराच्या प्रवेशद्वारातच हे अनाधिकृत बांधकाम असल्यामुळे हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्या जात होत्या. प्रशासनाने या वादग्रस्त थडग्याचा काही भाग काढला होता मात्र आज युवकांनी हे संपूर्ण थडगे जमीनदोस्त केले आहे. यापुढील काळामध्ये आली असेल त्या ठिकाणी बजरंग बलीच्या रुपाने आमचे हिंदू बांधव उभे राहतील.