कर्जत : अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव या गावांमध्ये अतिशय दुर्मिळ असणारी दुर्योधनाचे मंदिर आहे. हे दुर्योधनाची मंदिर दुर्गेश्वर महादेव मंदिराच्या शिखरावर आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी अखंड महाशिवनाम सप्ताह व श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्यभरातून शिवभक्त सहभागी झाले आहेत.

कर्जत तालुक्यातील दुरगाव या ठिकाणी महादेवाची मंदिर आहे. हे मंदिर अति प्राचीन असून याला दुर्गेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. व या मंदिराच्या शिखरावर दुर्योधनाचे दुर्मिळ असणारी अति प्राचीन मंदिर आहे. आणि या ठिकाणी ग्रामस्थ व भाविक यांच्या वतीने शिवनम सप्ताह साजरा होत आहे. राज्य सरकारने सन २०१७ यावर्षी पर्यटन व तीर्थक्षेत्रा म्हणून या मंदिराला मान्यता दिली आहे. यामुळे या परिसरामध्ये विविध विकास कामे करण्यात आली आहे यामध्ये मंदिराचे सुशोभीकरणाचे काम देखील सुरू आहे . हे मंदिर अति प्राचीन काळातील असून याला ऐतिहासिक वारसा आहे. ग्रामस्थांच्या वतीने याच मंदिरामध्ये दुर्योधन राहत होते असे सांगण्यात येते. याशिवाय दुर्योधनाच्या या मंदिरापासून 1000 मीटर वर गावाच्या नदीच्या कडेला अश्वत्थामाचे देखील अतिशय दुर्मिळ असे मंदिर आहे. या मंदिराची अवशेष अजूनही या ठिकाणी दिसून येतात. दुर्योधन हा शिवभक्त व योग विद्या पारंगत होता. यामुळे पाण्याखाली तासनतास बसून तो योग साधना करत असे. महादेवाचा दुर्योधन हा प्रिय भक्त असल्यामुळे त्याला या गावांमध्ये असणाऱ्या महादेवाच्या मंदिराच्या डोक्यावर महादेवाने स्थान दिले आहे असे ग्रामस्थ सांगतात.

कसे पाहिले तर दूर गाव हे मुळातच भौगोलिक परिस्थितीत अतिशय चांगले असलेले गाव आहे गावाच्या सभोवताली दोन ठिकाणी तलाव आहे व जवळच नांदणी नदी देखील वाहते कुकडी लाभ क्षेत्राचा या गावाला फायदा होतो. स्वच्छ सुंदर हरित अभियान या गावामध्ये सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच व सर्वांच्या मदतीने दूर गाव हे हरित स्वच्छ सुंदर करण्याचा उपक्रम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गावाच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आहे. सर्व गावकऱ्यांनी रोज श्रमदान करून गावातील परिसर नीटनेटका व स्वच्छ केला आहे. यामुळे दुर्योधनाचे गाव असू नये हे गाव राज्याच्या नकाशावर स्वच्छ सुंदर हरित गाव म्हणून ओळखले जाते.

शिवनाम सप्ताह या ठिकाणी ग्रामस्थांच्या पुढाकारामधून घेण्यात येतो महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भव्य मिरवणूक ही काढण्यात येते. शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने राज्यातून आणि देशभरातून भाविक या ठिकाणी येतात. प्रवचन कीर्तन यास विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वजण सहभागी होतात. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळत असून अध्यात्मिकांकडून ग्रामविकासाकडे गावाला घेऊन जाण्याची भूमिका या गावातील ग्रामस्थांनी ठेवली आहे अशी माहिती अशोक जायभाय माजी सरपंच यांनी दिली.

Story img Loader