राहाता : नेवासे तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते. आता ग्रामसभेने आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे. जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. असे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.

सौंदाळा येथे झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारला जाईल. शिव्या देताना आईचा व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अवयव संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो. त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई, बहिणींना व मुलीला आठवले पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे, असे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले आहे.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
thane municipal corporation property tax
ठाण्यात कर थकबाकीदारांवर कारवाईची चिन्हे, ठाणे महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती

हेही वाचा – सिंधुदुर्ग : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण; आंबा, काजू बागायतदार चिंतेत

यावेळी बालकामगार बंदीचा ठराव घेण्यात आला. बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा, अशी घोषणा करून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा. त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिले जाईल, असे ठरले. यावेळी ग्रामसेविक प्रतिभा पिसोटे, उपसरपंच कोमल आरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मीनीनाथ आरगडे, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला हजर होत्या.

हेही वाचा – Nitin Gadkari : “कुणी मुख्यमंत्री झाले नाही म्हणून दुखी तर कुणाला मुख्यमंत्रीपदावरून…”, राजकीय नेत्यांबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?

बालविवाहास बंदी

सौंदाळा गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे. गावात कुणीही बालविवाह करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ठरले. सोशल मीडिया व मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल द्यायचा नाही, असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. या ठारवाची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली. त्यास अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले.

Story img Loader