कर्जत : दवाखान्यामध्ये तपासणीसाठी नेलेला आरोपी बेडीसह पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. मात्र पोलिसांनी त्याला २४ तासांत जेरबंद केल्यानंतर त्यांच्या जीव भांड्यात पडला.

घडलेली घटना अशी की, श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये समाधान हरिभाऊ मगर (वय ३४ रा. माळीनगर, श्रीगोंदा, मूळचा जालना जिल्हा) हा आरोपी पोलीस ताब्यात होता. आरोपीस पोलीस अवघ्या १०० मीटर अंतरावर असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले. रुग्णालयामध्ये सर्व तपासणी झाल्यानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात परत नेत असताना त्याने पोलीस कॉन्स्टेबल सचिन म्हस्के याच्या हाताला झटका मारला आणि बेडीसह पळून गेला. यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी अनेक पथके तयार करून आरोपीच्या शोधार्थ पाठवली. पोलिसांना आरोपी हा दौंड परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. यानंतर सापळा रचून त्याला पोलिसांनी चोरी केलेल्या मुद्देमालासह जेरबंद केले.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

हेही वाचा – Narendra Modi Marathi Speech : “महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय…”, ठाण्यात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी मराठीतून संवाद; म्हणाले…

हेही वाचा – शिवसेना ठाकरे गटाचे जयसिंग घोसाळे शिंदे गटात दाखल, रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का

श्रीगोंदा परिसरामध्ये २३ सप्टेंबर रोजी स्वप्निल अंबर खेतमाळीस यांच्या दुकानातील कॉम्प्युटर, मोटरसायकल व रोकड तसेच औषधे असा एकूण दोन लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या चोरीचा तपास करत असताना श्रीगोंदा पोलिसांना ही चोरी समाधान हरिभाऊ मगर याने केल्याची माहिती मिळाली. मगर यास २९ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांनी अटक केली. यानंतर आरोपीला श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयामध्ये हजर केले असता त्यास ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दोन तारखेला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आरोपींनी पलायन केले होते. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडून ४४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये दोन कॉम्प्युटर व औषधाची पावडर याचा समावेश आहे. पलायन केल्यामुळे त्याच्यावर पुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. या घटनेने श्रीगोंदा पोलिसांची मात्र सर्वत्र नाचक्की झाली. नागरिकांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा आहे.