नगर : भारतीय हवाईदलाने पाकिस्तानमध्ये घुसुन केलेल्या हवाई हल्ल्याचे व दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केल्याच्या कारवाईचे नगरकरांनी जोरदार स्वागत केले. फटाके वाजवत, फलक फडकावत, केक कापत या कारवाईचे स्वागत करण्यात आले. चौकाचौकात या कारवाईबद्दल, भारतीय लष्कराबद्दल अभिमान व्यक्त करणारे फलक लावण्यात आले होते.

पुलवामा येथे केलेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेऊन भारतीय हवाईदल सेनेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आजच्या हवाई हल्ल्याचा  प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटेल. पाकिस्तानचा बदला घ्यावा, ही प्रत्येक भारतीय नागरिकाची इच्छा पूर्ण झाली आहे, याबद्दल संरक्षण विभागाचे करावे कौतुक तेवढे थोडेआहे, असे प्रतिपादन पाक व चीनविरुद्धच्या युद्धात सहभागी झालेले निवृत्त कर्नल अ‍ॅड. किसनराव काशिद यांनी केले. जिल्हा न्यायालयात वकील संघटनेने भारतीय लष्काराच्या कारवाईचे स्वागत करु न सैनिकांप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी केक कापून या कारवाईचा जल्लोष साजरा केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. शेखर दरंदले, प्रसाद गांगर्डे, सुरेश लगड, अनिता दिघे, राहुल पवार, अमितेश झिजुंर्डे, हेमंत गवळी, लक्ष्मण गव्हाणे, माधवराव पातवडेकर, वसिम सय्यद, गणेश आरे, नवाज पठाण, अतुल साळवे, मंदार पळसकर, पराग काळे, योगेश गेरंगे, गौरव दांगट आदि वकिलवर्ग उपस्थित होता.

शहर भाजपच्या वतीने ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा फडकावत ‘भारत माता की जय’चा घोष चौपाटी कारंजा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोर केला. सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, विवेक नाईक आदी सहभागी होते. तेलीखुंट येथील तरुणांनी फटाके फोडून पाकिस्तानवरील हल्ल्याचा जल्लोष केला. अभिजित ढोणे, नारायण दारुणकर, राजु कांबळे, दिनेश मंजतकर, निखिल ढोणे, त्रिलेश येनगंदुल, निलेश राठोड, भरत राठोड, मंगेश तिजोरे आदी उपस्थित होते.

Story img Loader