अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या मारहाणीविरोधात अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र लिहून मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सभागृहात माझ्याजवळ जर अंगरक्षक असते, तर माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झाला नसता, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या आठवड्यात अहमदनगर महापालिकेत महापौरपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत छिंदम यांनी शिवसेना उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यानेच पाठिंबा मागितला होता, असे सांगत छिंदमने कॉल रेकॉर्डिंगही जारी केले होते. यानंतर आता छिंदमने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र पाठवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ‘महापौर निवडणुकीच्या वेळी संरक्षणासाठी मी रितसर पोलिसांकडे अंगरक्षकाची मागणी केली होती. त्याप्रमाणे मला अंगरक्षक मिळालेही होते. मात्र अंगरक्षक सभागृहात उपस्थित न राहता सभागृहाबाहेर थांबले, त्यामुळे सभागृहात मतदान प्रक्रिया चालू असताना मी महापौरपदाकरिता मतदान केल्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला करून मारहाण केली. सभागृहात माझ्याजवळ जर अंगरक्षक असते, तर माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झाला नसता. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करावी’, अशी मागणी त्यांनी केली.

महापौरपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे, अमोल येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व इतर चार जणांनी मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या सर्वांनी मला मतदान करण्यापासून रोखले व शिवीगाळ, घोषणाबाजी करून मतदान प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.