लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
छत्रपतीसंभाजीनगर : फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी (बॅस्टिल डे) आयोजित लष्करी कवायतीमधील राफेल विमानांच्या उड्डाणांमध्ये पूर्णा तालुक्यातील वैमानिक सुशील शिंदे याचा समावेश झाला. पॅरिसपासून सात हजार किलोमीटरवरुन हा सोहळा पाहणाऱ्या ५६ वर्षाच्या शंकर शिंदे यांच्यासाठी शुक्रवारी आनंदाचा आणि कौतुकाचा दिवस होता. या सोहळ्यास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती. शुक्रवारच्या लष्करी कवायतीमध्ये तीन भारतीय राफेल विमानांचा आवर्जून समावेश करण्यात आला होता.
सुशील शिंदे मूळचे परभणीतल्या पूर्णा तालुक्यातले
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सुशील शिंदे यांनी त्यांचे शिक्षण सातारा येथील सैनिकी शाळेतून २००७ मध्ये पूर्ण केले. वैमानिकांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यापूर्वीही राफेल कंपनीचे विमान उडविले होते. याशिवाय जॅग्वार तसेच विविध प्रकारचे विमान उडविण्याचा अनुभव असणाऱ्या सुशील शिंदे यांचा फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी १४ जुलै रोजी होणाऱ्या लष्करी कवायतीमध्ये समावेश करण्यात आला. त्याची बहिणही भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून काम करते आहे. सुशील यांनी या पूर्वीही युरोपातील काही देशांमध्ये हवाई दलाच्या कवायतीमध्ये भाग घेतला होता. फ्रान्सच्या लष्करी कवायती दरम्यान हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही प्रक्रियाही त्यांनी केली.
दोन दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय दिनी होणाऱ्या लष्करी कवायतीच्या या कार्यक्रमास ते फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या समवेत उपस्थित होते. १७८९च्या फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान बॅस्टाईल कारागृतील घटनांबाबतची संवदेनशिलता व्यक्त करण्यासाठी हा दिवस फ्रान्सचा राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो.
अनेक शतकांपासून १४ जुलै साजरा केला जातो
फ्रेंच राज्यक्रांती पश्चात राजकीय मंथन केल्यानंतर १४ जुलै हा बॅस्टिल डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. तथापि, १८७० साली फ्रान्ससाठी राष्ट्रीय दिवस साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. १४ जुलै १८८९ साली बॅस्टिलच्या उठावाला १०० वर्ष पूर्ण होणार होती. यादिवशी फ्रान्सने हिंसाचार आणि खून पाहिले होते, त्यामुळे १४ जुलै १८९० साली बॅस्टिल दिनाला राष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर करण्यात आले. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय दिवस साजरा करण्यासाठी जो कायदा करण्यात आला, त्यात कोणत्या १४ जुलैसाठी हा दिवस साजरा केला जाणार हे मुद्दाम अस्पष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज प्रत्येकालाच हा बॅस्टिल डे असल्याचे वाटते.