सोलापूर : भारतीय क्रिकेट संघातील खेलाडू अजिंक्य रहाणे याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावातील अंगणवाडी, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट दिली. या वेळी त्याने अंगणवाडीतील खिचडीचा आस्वाद घेत चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘अर्थ फिट’ या सामाजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी रहाणे हा सोलापुरात आला होता. मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात त्याने जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडीसह ग्रामपंचायतीला भेट दिली.

Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
tigress latest marathi news
महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
grandparent educational group formed by Prashant Bhoyer training grandparents and grandchildren together in school
आजी आजोबांसोबत शिक्षण: युवा शिक्षकाचा अफलातून प्रयोग
Dharmarakshak Sambhaji movie, Karad ,
सातारा : ‘धर्मरक्षक संभाजी’ प्रदर्शित करा अन्यथा, दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू; कराडमध्ये सेवाभावी संस्थांचा इशारा

हेही वाचा – सोलापूर : रणजितसिंह मोहिते यांना भाजपकडून पक्षशिस्तीची ‘कारणे दाखवा’ नोटीस

अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत रहाणे याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या खिचडीचा आस्वाद घेतला. अंगणवाडीतील स्वयंपाकगृहाची त्यांनी पाहणी केली. नंतर मुलांमध्ये बसून गप्पा मारल्या. या वेळी विविध वस्तूंची असलेली ओळख त्यांनी मुलांकडून जाणून घेतली.

हेही वाचा – “ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…

भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हे वडापूर गावात आल्याची माहिती पंचक्रोशीत कळल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी, विशेषतः क्रिकेटप्रेमी तरुणांची गर्दी झाली होती.

Story img Loader