शरद पवारांची साथ सोडण्यासाठी मला दोन बड्या नेत्यांनी विचारलं होतं. तसंच भाजपामधल्या लोकांनी तर थेट ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी शरद पवार यांना घट्ट पकडून ठेवावं भाजपात येण्यासाठी हातपाय जोडू नये असं वक्तव्य भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी केलं होतं त्यावर विचारलं असता एकनाथ खडसेंनी हा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले आहेत एकनाथ खडसे?
मला अजित पवारांचा फोन आला होता. अमोल मिटकरींमार्फत त्यांनी बरोबर येण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर मी नाकारली. मी शरद पवारांसह आहे आणि त्यांच्याच बरोबर राहणार आहे असं मी मिटकरींना सांगितलं. मला या दोन्ही नेत्यांनी ऑफर दिली होती. पण मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे आणि त्यांची साथ सोडणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार गटात जायला किंवा भाजपात जायला मी उतावीळ आहे असं महाजन म्हणतात. मात्र मी त्यांच्याकडे कधी आलो हे अजित पवारांनी जाहीर करावं. अजित पवारांनीच मला बरोबर येण्यासाठी विचारणा केली. मिटकरींनी मला फोन केला. भाजपावाले तर रोज समोरून ऑफर देतात. मी भाजपाकडे गेलो नाही तर मी अजित पवारांच्या बरोबर कसा काय जाईन? असाही प्रश्न खडसेंनी विचारला.
मी सत्तेसाठी कोणाचाही हांजीहांजी करणारा नेता नाही. मी कोणाच्याही मागे उभा राहून फोटो काढणारा माणूस नाही. मीच संकट मोचक, मीच संकट मोचक आहे असं सांगून पुढे पुढे करणारा माणूस मी नाही. स्वाभिमानाने जगलो. स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचं असलं तर कधीच गेलो असतो, असं म्हणत नाथाभाऊंनी गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली.
अजित पवार काय म्हणाले?
एकनाथ खडसेंच्या या गौप्यस्फोटाविषयी अजित पवार यांना विचारलं असता, मी कुणालाही फोन केला नाही. तसंच मी अमोल मिटकरींच्या मार्फत कशाला कुणाला फोन करेन? मी थेट बोलणारा माणूस आहे कुणाशी बोलायचं असेल तर मी थेट बोलतो कुणाच्याही मार्फत बोलत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.