राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाच्या घरी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर, दुसरीकडे साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे पुण्यात होते.

या बैठकीनंतर पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका बड्या व्यावसायिकच्या घरी शरद पवार आणि अजित पवार दाखल झाले. या नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी जयंत पाटील हेही बैठकीला उपस्थित असल्याची चर्चा आहे. या भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही.

दरम्यान, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांसह काही आमदारांनी शरद पवार यांची सलग दोन दिवस यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar and sharad pawar meet in pune businessman house koregaon park ssa
Show comments