विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘अजित पवार नॉट रिचेबल’ अशा आशयाचा बातम्या वृत्तवाहिन्यांवर काल रात्रीपासून (८ एप्रिल) दाखवल्या जात आहेत. अशातच पवार आज (९ एप्रिल) माध्यमांसमोर आले आणि त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना चांगलंच सुनावलं. अजित पवार यांनी पुण्यातील खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आज उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली, तसेच कालपासून सुरू असलेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे काल पुण्यात नियोजित तीन कार्यक्रम होते. पण काल अचानकपणे दुपारी दोन वाजता अजित पवार यांनी तिन्ही कार्यक्रम रद्द केले. कार्यक्रम रद्द करण्याचं कारण समजू शकलं नव्हतं, त्यानंतर आजचे आठ कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, आज सकाळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. तसेच ते नॉट रिचेबल असण्याच्या बातम्या खोट्या ठरवल्या. दरम्यान, पवार यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर नाराजी देखील व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले की, काल काम करत असताना मला पित्ताचा त्रास होऊ लागला. जागरणं आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधं घेतली आणि झोपलो. आज बरं वाटू लागल्यानंतर सकाळपासून मी कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमं कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होतं.

…आणि अजित पवार संतापले

अजित पवार म्हणाले, मी नॉट रिचेबल आहे, अशा आशयाचा बातम्या दाखवल्या जात होत्या. हे सगळं बंद करा ना, तुम्ही आधी सत्यता तपासा, ती व्यक्ती कुठे आहे ते तपासा. कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची असं सुरू आहे, पण बदनामी किती करायची याची एक मर्यादा असते. आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला आमच्या बातम्या देण्याचा अधिकार आहे. परंतु अशा प्रकारच्या बातम्या देणं बरोबर नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. वर्तमान पत्रातदेखील अशा बातम्या पाहून मला वाईट वाटलं.