राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवार) राज्याच्या चार महिन्यांच्या खर्चासाठी लेखानुदान सादर केले. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची लागलेली चाहूल या लेखानुदानात पहावयास मिळाली. गेल्या दहा वर्षात राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे पवारांनी यावेळी नमूद केले. राज्यातील सर्वांसाठी वीज दरात २० टक्क्यांनी कपात करण्याच्या महत्वपूर्ण घोषणेबरोबरच, मदरसा आधुनिकीकरण – विज्ञान,गणित शिक्षण, अल्पसंख्याक विद्यार्थी योजनेसाठी ८१ कोटी, अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रासाठी ४० कोटी, घरकूल योजनेसाठी ३३३ कोटी, रोजगार हमी योजनेसाठी २५० कोटींची भरघोस तरतूद करत सरकारने मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध वर्गांना खुश करण्यासाठी आधीच तिजोरीवर मोठय़ा प्रमाणावर बोजा पडला आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सवलतींची खैरात करण्याची सत्ताधाऱ्यांची योजना या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
राज्याच्या चार महिन्यांच्या खर्चासाठी लेखानुदानात सवलतींची खैरात
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची लागलेली चाहूल या लेखानुदानात पहावयास मिळाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-02-2014 at 03:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar announce maharashtras budget