Ajit Pawar News : सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? असा सवाल विरोधक विचारत आहेत. त्याचप्रमाणे अजित पवारांनी गुलाबी रंगाची जी थीम घेतली आहे त्यावरुन विचारलं असता सरडा रंग बदलतो अशी टीका केली. आता पुण्यातल्या जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी ( Ajit Pawar ) संजय राऊतांसह विरोधकांना उत्तर दिलं.

गुलाबी रंग का निवडला यावर अजित पवार काय म्हणाले?

जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगच का? असं विचारलं असता अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, “मला गुलाबी रंग आवडला म्हणून आम्ही निवडला. अमुक एक रंग निवडला म्हणून जर मतं मिळाली असती तर रोज वेगवेगळे रंग निवडले असते. पुरुषांना काय आवडतं? तो रंग वापरु वगैरे असं निवडलं असतं. आम्ही एक थीम निवडली आहे त्या अंतर्गत गुलाबी रंग निवडलाय इतकंच कारण आहे. आमच्या मनात रंग आला त्यामुळे नाही. आता या रंगाची चर्चा होते. अजित पवार ( Ajit Pawar ) या कलरचं जॅकेट का होतं? चर्चा होते. जांभळ्याच्या आतला जो रंग असतो तो रंग आम्ही घेतला आहे.”

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
Mohan Bhagwat News
Mohan Bhagwat : मोहन भागवत यांचं तीन मुलं जन्माला घालण्याचं आवाहन; विरोधकांची जोरदार टीका, “स्त्रियांचं शरीर म्हणजे..”

हे पण वाचा- Sanjay Raut: “नागपूरमुळेच आम्ही कारागृहात”, भाजप नेत्यांचे नाव न घेता संजय राऊत म्हणाले

संजय राऊत काय म्हणाले होते?

सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आता ‘पिंक’ झाले आहेत. सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा ‘पिंक’ सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे हे माहीत नाही. पण एक सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीणा नाही. आपला रंग भगवाच आहे. केसीआर यांचा पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो पिंक नही चलेंगा… एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालेल. भगवा रंगच तिरंग्याला वाचवेल, असे बाळासाहेब म्हणायचे, हे उदाहरण संजय राऊत यांनी दिलं.

संजय राऊतांना अजित पवारांचं जोरदार उत्तर

अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, कोण आम्हाला शिव्या देतं आहे, कोण शाप देतं आहे? कोण कुणाला सरडा, ढेकूण म्हणतं आहे? मात्र यामुळे राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? राज्याचा कायपालट होणार आहेत का? याचं उत्तर विरोधकांनी दिलं पाहिजे. उगाच आई बापाने जन्माला घातलं म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला हे चालतं का? आज जनता सूज्ञ आहे असं अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले.

Story img Loader