Ajit Pawar Asks Will You Get Elected Only By Praying: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि भाषणाच्या खुमासदार शैलीसाठी ओळखले जातात. पत्रकार परिदष असो की जाहीर सभा त्यामध्ये ते मोकळेपणाने बोलल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशात आता जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये अजित पवार यांनी, “नुसतं देव-देव केलं तर निवडून येणार आहे का?”, असा सवाल कार्यकर्त्यांना केला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विजयाबाबतही भाष्य केल्याचे पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी आमदरा सुरेशकुमार जेथलिया यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानिमित्ताने परतूरमध्ये पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे विधान केले आहे.

नुसतचं देव-देव केला तर…

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित असे यश मिळाले नाही. तटकरे साहेब एकटे निवडून आले म्हणून आपली काहीतरी लाज राहीली. परंतू, आपण खचलो नाही. मी नेहमी महाराष्ट्रामध्ये लोकांना सांगत असतो आणि तुम्हालाही सांगतो, यश आलं म्हणून हुरळून जायचे नाही आणि अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही. लोकसभा निवडणुकीत माझ्या विधानसभा मतदारसंघात माझ्या पत्नीला ४८ हजार मतं कमी पडली म्हूणून रडत बसलो नाही. पण, नुसतचं देव-देव केला तर निवडून येणार आहे का? त्यामुळे श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्नही सोडवा.”

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महायुतीला फटका बसला होता. यामध्ये सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला. त्यांनी लढवलेल्या ४ पैकी ३ जांगांवर पक्षाचा पराभव झाला होता. तर सुनील तटकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत सत्ता कायम राखली. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही चांगले यश मिळाले होते.

कोण आहेत सुरेशकुमार जेथलिया?

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया हे जालाना जिल्ह्यातील परतून विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा प्रमुख चेहरा होते. दरम्यान त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. मात्र यामध्ये त्यांचा परभव झाला होता. त्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.