अजित पवार यांनी ९ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज ( ५ जुलै ) अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ‘पॉवर’ दाखवण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “आपण अल्पसंख्याक समाज, ओबीसी समाजाला दोन आणि भटक्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं. उद्या महामंडळ, मंत्रीपदे मिळणार आहेत. पण, सर्वांना आपल्या भागात काम करावे लागेल.”

हेही वाचा : छगन भुजबळांच्या ‘विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं’ विधानावर शरद पवारांची टोलेबाजी; म्हणाले…

“शरद पवार हे आपले दैवत आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी विनंती केली. त्याप्रमाणे मी साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की, अजूनही मार्ग काढावा. काही आमदारांची ससेहोलपट होत होती. इकडं आड, तिकडं विहीर. पण, काही अशी लोक घेतलेत की, संघटनेचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाला कोण, उदाहरण द्यायचं झालं, तर तो ठाण्यातील पठ्ठा… त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे पक्ष सोडून गेले. वसंतराव डावखेरे वयस्कर असताना म्हणायचे, शरद पवार कशाला यांना मोठं करत आहेत,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे”, भुजबळांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“आपल्यातील सहकाऱ्यांनी स्वत: नेतृत्व करत बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. एका मंत्र्यांनी चार आमदार निवडून आणले पाहिजेत. पण, ठाण्यात आपले आमदार घालवणाऱ्याला नेता केलं. काही प्रवक्ते चांगल्याचं बोलून वाटोळ करतात. तशा पद्धतीचे काम ती व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीका अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar attacks jitendra awhad over mla gone ncp party ssa
Show comments