उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. “मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेत वसंतदादा पाटील यांना बाजूला केलं,” असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

अजित पवार म्हणाले, “माझे विचार अतिशय स्पष्ट असतात. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते. तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षालाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली.”

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

हेही वाचा : “भाजपाबरोबर जाण्यासाठी मी सही केली होती, पण…”, जितेंद्र आव्हाडांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

“बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे, आता…”

“याआधी ४० वर्षांच्या आतच वेगळे निर्णय घेण्यात आले. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळा निर्णय घेतला. इथून पुढं फक्त माझे ऐका. बाकी कुणाचं ऐकू नका. बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे. आता माझे ऐका,” अशी तंबी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

हेही वाचा : “सगळं यालाच कळतं का?” अजित पवार गटातील मंत्र्याची आव्हाडांवर टीका; म्हणाले, “पक्षात कुणी विचारत नसल्यानं…”

“मी घेतलेला निर्णय योग्य असल्यानं आमदार माझ्याबरोबर”

“माझ्याबरोबर विधानसभेतील ५३ पैकी ४३ आमदार आहेत. देवेंद्र भुयार आणि संजमामा शिंदे या दोन अपक्ष आमदारांनीही पाठिंला दिला आहे. विधानपरिषदेतील ९ पैकी ६ आमदार माझ्याबरोबर आहेत. मी घेतलेला निर्णय योग्य असल्यानेच ही लोक माझ्याबरोबर आली,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Story img Loader