Ajit Pawar Deputy Chief Minister : मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि सहा वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अजित पवार यांची यंदाही उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे.राजकारणातील वादळांमध्ये अजित पवार अनेक वेळा अडचणीत आले आहेत, पण बारामतीचे आठ वेळा निवडून आलेले आमदार आणि एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि नेतृत्वाने त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.

अजित पवार एक कडवट प्रशासक म्हणून ळखले जातात. त्यांचे काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारण शिकले. २०१० मध्ये पहिल्यांदा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा ते उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर जवळपास चारवेळा ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत.

Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
Forest Minister Ganesh Naik Challenges
लोकजागर : नाईकांसमोरचे आव्हान!

नाशिकराव तिरपुडे पहिले उपमुख्यमंत्री

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची परंपरा १९७८ पासून सुरू झाली होती. नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री. त्यानंतर विविध काळात अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले. अजित पवार यांनी या पदावर एकूण सहा वेळा काम केले आहे, जो एक विक्रम आहे.

नोव्हेंबर २००४ मध्ये, आर. आर. पाटील यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि चार वर्षांपेक्षा अधिक काळ ते या पदावर होते. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या परिणामस्वरूप त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपदावर नियुक्त करण्यात आले, ते १० नोव्हेंबर २०१० पर्यंत कार्यरत होते. भुजबळ यांच्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आणि तेव्हापासून ते सहा वेळा उपमुख्यमंत्री बनले आहेत.

नोव्हेंबर २०१० मध्ये, अजित पवार यांनी आपल्या शरद पवार यांच्याविरोधात जाऊन छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्यास विरोध केला होता. २०१२ च्या सप्टेंबरमध्ये, ७०,००० कोटींच्या जलसिंचन घोटाळ्यात त्यांचं नाव आल्यावर भुजबळांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, तीन महिन्यांनी ते “क्लीनचिट” घेऊन पुन्हा सरकारमध्ये परतले.

चार मुख्यमंत्री अन् एक उपमुख्यमंत्री

अजित पवारांनी १० नोव्हेंबर २०१० मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पृथ्वीराज चव्हाण हे तेव्हा मुख्यमंत्री होते. २५ सप्टेंबर २०१२ पर्यंत ते तेव्हा उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर, २५ ऑक्टोबर २०१२ ते २६ सप्टेंबर २०१४ तेव्हाही पृथ्वीराज चव्हाण यांच्या पदाखाली त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या काळात ते औटघटेकेचे उपमुख्यमंत्री बनले हते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी या पदाची शपथ घेतली. परंतु, हे सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं.

हे सरकार कोसळल्यानंतर लागलीच ३० नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ पर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

जून २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला. त्यानंतर २ जुलै २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.

आता ते पुन्हा ५ डिसेंबर २०२४ मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Story img Loader