राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? हा वाद आता थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवार गटानं पक्षावर व निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदही आमच्याकडे असल्याची भूमिका अजित पवार गटानं घेतली आहे. त्याचवेळी समोरून शरद पवार यांनी आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात असताना आता खुद्द अजित पवारांनीच आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं विधान केलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना पक्षाच्या सर्व ५३ आमदारांनी शरद पवारांना सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पत्र दिलं होतं, असं विधान केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी “त्यांनी पत्र दिलं होतं, पण त्यावर चर्चा झाली होती, निर्णय नाही. चर्चा आणि निर्णय यात फरक आहे. जयंत पाटील पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. यासंदर्भातला निर्णय आमच्याकडून होईल”, अशा आशयाचं विधान केलं होतं.

Vice President said Today we are in corruption free India
नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sarbanand Sonowal asserts that the port is an attraction for the world
वाढवण बंदर जगासाठी आकर्षणबिंदू -सोनोवाल
Why did prakash ambedkar refrain from commenting on the BJP-Sangh coordinators question
भाजप-संघ समन्वयकाच्या प्रश्नावर आंबेडकरांनी भाष्य का टाळले?
Sharad Pawar
Sharad Pawar: ‘त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत’, राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांबाबत शरद पवारांचे सूचक विधान
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar X
Mahyuti Disruption : तानाजी सावंतांपाठोपाठ भाजपा नेत्याची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “त्यांच्यामुळे आमचं वाटोळं…”, महायुतीत धुसफूस चालूच
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: राष्ट्रपतींचे भाष्य लक्षणीयच, पण…

सुनील तटकरे म्हणतात, अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष

एकीकडे शरद पवारांनी भूमिका स्पष्टपणे मांडली असताना दुसरीकडे सुनील तटकरे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची भूमिका मांडताना दिसले. “निवडणूक आयोगाकडून आमच्या बाजूने निर्णय लागेल असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे आम्ही याचिकेत सांगितलं आहे. त्यामुळे त्यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल”, असं सुनील तटकरे म्हणाले.

कौतुक की टोला? अजित पवारांची चंद्रकांत पाटलांवर मिश्किल टिप्पणी; पत्रकाराला म्हणाले, …

अजित पवारांनी केलं शिक्कामोर्तब

दरम्यान, आत्तापर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नव्हती. मात्र आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर वक्तव्य केलं आहे. सुनील तटकरेंनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी अजित पवारांची प्रतिक्रिया विचारली असता त्यावर “मला माझ्या सहकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळे मी आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

“होय, अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि तेच यापुढेही…”, छगन भुजबळ यांनी सगळंच सांगितलं

भुजबळांचं भाषण नीट ऐकलंच नाही!

छगन भुजबळांनी बीडमध्ये झालेल्या सभेतून बोलताना शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. यासंदर्भात विचारणा केली असता आपण भुजबळांचं सभेतलं भाषण व्यवस्थित ऐकलंच नाही, असं अजित पवार म्हणाले. “सोशल मीडियावर बघत असताना काही बातम्या मला वाचायला मिळाल्या. माझं मत आहे की राजकीय जीवनात काम करत असताना आपण आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडायला हवी. ते करत असताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ही काळजी घेतली पाहिजे”, असं ते म्हणाले.