Ajit Pawar : महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. १६ डिसेंबर म्हणजेच आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होतं आहे. त्याआधी नागपूरमध्ये ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यानंतर महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी ( Ajit Pawar ) दिलेल्या उत्तरामुळे एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुणाला कुठलं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

खातेवाटप कधी? असा तुमचा प्रश्न असेल, तर येत्या दोन दिवसात आम्ही खाते वाटप पूर्ण करू, त्याबद्दल आमची सर्व क्लियारीटी झाली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आणि खातेवाटपाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, आता कोणतं खातं कोणत्या पक्षाकडे आणि नेत्याकडे येणार हे पाहणे महत्त्वाचे आणि उत्सुकतेचं ठरणार आहे.

अजित पवारांचं ते उत्तर आणि एकच हशा

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मंत्रिमंडळ सर्व समावेशक आहे, सर्व समाजाला त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिला मंत्र्यांना आधीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, अजित पवार केव्हा मुख्यमंत्री होतील असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, बाजूलाच बसलेल्या अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिलं, “मी अडीच महिन्यासाठीही मुख्यमंत्री होऊ शकतो”, असं अजित पवारांनी ( Ajit Pawar ) म्हणताच एकच हशा पिकला.

चहापानाचा कार्यक्रम करावा की नाही असा प्रश्न पडला आहे-अजित पवार

चहापानावर अलीकडे विरोधी पक्ष सतत बहिष्कार घालतात त्यामुळे चहापानाचा कार्यक्रम करावा की नाही करावं असा प्रश्न पडला आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आहे. दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री सर्वांचे खातेवाटप करतील आणि सरकार कामाला लागल्याचं दिसून येईल. विरोधक संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर सदस्यांना योग्य उत्तर दिलं जाईल. आम्हाला प्रचंड बहुमत आहे, म्हणून रेटून सभागृह चालवायचं असं कधीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी आधीच ही भूमिका स्पष्ट केली आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं तसेच, महाराष्ट्रातील परंपरा आहे, विरोधकांचा सन्मान ठेवून कामकाज चालवलं जातं. आम्ही विरोधकांकडे ते संख्येने कमी आहेत म्हणून दुर्लक्ष करणार नाही याची ग्वाही देतो, असेही पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.