सातारा : आम्ही तिघेही एकत्रच आहोत, एकनाथ शिंदे आणि माझे संबंध खूपच चांगले आहेत. अर्थ खात्याच्या फाईल मंजूर होत नाहीत अशी तक्रार ते अमित शहा यांच्याकडे करतील, असे वाटत नाही. सरकारच्या अनेक निर्णयासाठी दर आठवड्याला आम्ही एकत्र बसत असतो. चर्चा करून मार्ग काढत असतो. सर्व व्यवस्थित चालले आहे. त्यामुळे ते तक्रार करतील, असे वाटत नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात दिले.
अमित शहा मुंबईमध्ये आल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बरोबर होते. त्यांनी तक्रार केली असेल तर फायलींबाबत अमित शहा बोललेच नाहीत असेही अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याकडून फाईली मंजूर होत नसल्याची तक्रार केल्या. या बाबत साताऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता अमित शाह मला असं काही बोलले नाहीत, असं म्हणत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
अर्थखात्याच्या फायलींबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माझ्याशी बोललेच नाहीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फायलींची पूर्तता होत नसल्याची तकार करतील, असे वाटत नाही. आम्ही मंत्रालयात अनेक निर्णयांवर चर्चा करतो. काहीही सांगायचे असेल तर ते स्वतः माझ्याशी बोलतील. त्यांची तक्रार ही निव्वळ ‘सूत्रां’ची माहिती असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
रायगडावर नेमकं काय घडलं, भाषण का केलं नाही, याचं कारण स्वत: अजित पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे कसं गेले पाहिजे, या संदर्भाने रायगडावर चर्चा झाली. तसेच रायगडावर सर्वांनी भाषणे केली. पण वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केले नाही.’