राज्यात भाजपाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांसह सत्तास्थापन केली. यानंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्याची घोषणा झाली आणि देवेंद्र फडणवी यांना केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. “चंद्रकांत पाटलांना मंत्रीपद मिळेल का नाही हेच अद्याप सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी बाकडं वाजवू नये,” असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला. ते रविवारी (३ जुलै) विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या स्वागतपर भाषणात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक धाकधूक आहे. भाजपाचे १०५ आमदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून विचारा की जे घडलंय त्याने आपलं समाधान झालं आहे का? चंद्रकांत पाटील यांनी यावर बाकडं वाजवू नये. तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही. कुठं बाकडं वाजवताय? शिवसेनेतून तिकडे गेलेल्या ३९ लोकांपैकी किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहे? सगळ्यांना वाटतंय मिळेन. काय होईल काही सांगता येत नाही.”

Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Chhagan Bhujbal On Amit Shah
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

“एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हायचंय हे माझ्या कानात सांगितलं असतं, तर मी…”

“एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केलं आहे. कशामुळे घडलं, काय घडलं माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की अजित उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे मला मुख्यमंत्रीपद द्या. तर मीच उद्धव ठाकरेंना सांगून आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं असतं. काहीच अडचण आली नसती,” असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच आदित्य काही अडचण आली नसती ना? असं म्हणत आदित्य ठाकरेंनाही कोपरखळी लगावली.

“कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले”

अजित पवार पुढे म्हणाले, “अनेक कट्टर काम करणारे मान्यवर थोडेसे नाराज आहेत. देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलत होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितलं तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. सगळ्या महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता.”

“गिरीश महाजनांनी तर फेटा सोडून डोळ्याचं पाणी पुसलं”

“गिरीश महाजन यांचं तर अजूनही रडणं बंद होईना. त्यांना फेटा बांधायला दिला तर त्यांनी फेटा सोडून डोळ्याला आलेलं पाणी पुसण्यासाठी फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचं फारच वाईट वाटलं,” असं म्हणत अजित पवारांनी गिरीश महाजन यांनाही कोपरखळी लगावली.

“मला मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं”

भाजपाच्या नेत्यांवर बोलताना अजित पवार म्हणाले, “मी जेव्हा सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो तेव्हा मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त मान्यवर पाहायला मिळतात. आमच्या मान्यवरांना पदावर बसलेलं पाहून मला मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं. ते मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेत. पहिली रांग पाहिली तरी ते लक्षात येईल.”

हेही वाचा : “नार्वेकरांना जवळ करा नाही तर तुमचं काही खरं नाही,” अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला देताना मिश्किल टिपण्णी

“आमच्याकडून गेलेले मान्यवर सत्ताधाऱ्यांच्या पहिल्या ओळीत”

“गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे आमच्याकडून गेलेले मान्यवर पहिल्या ओळीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे बसलेले दीपक केसरकर तर काय चांगले प्रवक्ते झाले आहेत. म्हणजे त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं.

Story img Loader