नाशिकमधील वणी येथे सप्तश्रृंगी घाटात ३५ प्रवासी असलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या.

बुधवारी (१२ जुलै) सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली. तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरू असल्याचे सांगत अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

नेमकं काय घडलं?

राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा येथील खामगाव आगाराची बस मंगळवारी सप्तश्रृंगी गडावर रात्री उशिराने आली. बुधवारी सकाळी परतीच्या प्रवासाला लागली. घाट मार्गावरील गणपती वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस दरीत कोसळली. बसमध्ये साधारणत: ३२ प्रवासी होते. त्यातील १५ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने अद्याप मदत कार्य सुरू असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी दिली.

हेही वाचा : Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी गडावर बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, १५ प्रवासी जखमी, मदत कार्य सुरू

जखमींवर तातडीने उपचाराची पालकमंत्र्यांची सूचना

सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघातात १८ प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची आहे. त्यात १८ प्रवासी प्रवास करीत होते. गड उतरत असताना गणपती पॉइंट वळणावर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी दक्षता घेण्याची सूचना भुसे यांनी केली आहे.