गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दोऱ्यावर गेले होते. मात्र, दौऱ्यावर असतानाही ते महाराष्ट्राच्या घडामोडींचा अहवाल घेत होते. मागील तीन चार दिवसापासून फोनवरून कामे मार्गी लावतानाचे एकनाथ शिंदेंचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते त्यावेळेस अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
हेही वाचा- हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाविषयी काहीही प्रेम नाही – सुप्रिया सुळेंची टीका
डीपीडीसी निधी रद्द केल्याची दाद सर्वोच्च न्यायालयात मागणार
पवार म्हणाले, तुम्हा पुणेकर पञकारांना माझ्या कामाची पद्धती चांगलीच माहिती आहे. मी पण अधिकाऱ्यांना थेट फोनच लावतो पण त्यावेळी कॅमेरा चालू करायला सांगत नाही, अस म्हणत पवारांनी शिंदेवर टीका केली आहे. आमच्या काळातील डीपीडीसी निधी या सरकारने रद्द केला आहे. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, सरकार बदललं म्हणून विकासाचा निधी रद्द करायचा नसतो, असेही पवार म्हणाले.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा- राज्यात मुसळधार पाऊस; गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू तर ८३८ घरांना पुराचा फटका
शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करणार
सरकार येत असतात, सरकार जात असतात. मात्र, स्वतःचा राजकीय हट्ट सोडून जनतेच भल काय आहे. पुढचा विचार करून फायदा कश्यात आहे याचा विचार केला पाहिजे. सरकार बदललं म्हणून उठसूठ सर्वच निर्णय रद्द करायचे नसतात. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी आम्ही याबाबत चर्चा करणार असल्याचे पवार म्हणाले.