पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना टोला लगावला. ”पंतप्रधान मोदी यांच्या भोवती भाजपा हा पूर्ण पक्ष चालतो. मोदींच्या फोटो शिवाय एकातही निवडून येण्याची ताकत नाही”, असे ते म्हणाले. तसेच नाराज असल्याच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एकही कार्यकर्ता उमेदवारीसाठी शिल्लक ठेवू नका – बावनकुळे

काय म्हणाले अजित पवार?

”प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या नेत्यांच्या नावे कार्यक्रम आयोजित करत असतो. आम्हीही शरद पवार यांच्या नावाने अनेक कार्यक्रम घेत असतो. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आणि भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवतीच पक्ष चालणार आहे. त्यांच्या नावावरच आज अनेक भाजपाचे नेते निवडून येत आहेत. त्यांचा फोटो न वापरता एकातही निवडून येण्याची हिंमत नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटपाचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यावेळी त्यांनी नाराज असल्याच्या आरोपावरही स्पष्टीकरण दिले आहे. ”पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मी सकाळपासून व्यासपीठावर बसलो होतो. त्यामुळे थोड्यावेळ बाहेर गेलो होते. माझे नाराज होण्याची कोणतेही कारण नाही. पक्षाने मला भरपूर काही दिले आहे. मला उपमुख्यमंत्रीपद आणि आता विरोधी पक्षनेते पदही मला दिले आहे. त्यामुळे जबाबदारीने मी आज हे सर्व सांभाळतो आहे”, असे ते म्हणाले.

Story img Loader