राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याची शक्यता आज सकाळपासून वर्तवली जात होती. न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानंतर या चर्चेला जोर धरला. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतु, या चर्चेला खुद्द अजित पवारांनीच पूर्णविराम दिला आहे. “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी दिली. दिवसभर चर्चा रंगल्यानंतर दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी पक्षासाठी काम करत राहणार”, असंही ते म्हणाले.

“राष्ट्रवादी पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. १० जून १९९९ पासून आम्ही काम करतोय. आजही आम्ही काम करतोय, उद्याही करत राहणार. जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे, तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत राहणार”, असं म्हणत अजित पवारांनी आज सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला.

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”

हेही वाचा >> राजकीय भूकंपाबाबतची मोठी अपडेट; नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी मांडली थेट भूमिका, म्हणाले…

कार्यकर्त्यांना आवाहन

“या बातम्या विपर्यास करून दाखवल्या जातात. अशा चर्चा सुरू झाल्याने जवळचे कार्यकर्ते नाराज होतात. संभ्रामवस्थेत जातात. परंतु, यात काहीही तथ्य नाही. प्रत्येकाने आपआपलं काम करा, महाविकास आघाडी बळकट होण्याकरता प्रयत्न करा”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

अजित पवारांनी सांगितला घटनाक्रम

“माझ्याबाबत जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी आरोप करण्यात आले. परंतु, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा असल्याने तिथे गेलो होतो. उद्धव ठाकरे तिथे विमान घेऊन आले होते. त्यामुळे त्यांना विनंती करून मी त्यांच्या विमानातून मुंबईत परतलो. दरम्यान, महराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय झाला. या पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांना त्रास झाला. काहीजण बेशुद्ध झाले. उष्माघातामुळे काहींचा जीव गेला. एवढं मोठं संकट मोठ्या प्रमाणावर येतं त्यावेळी त्यांना आधार देण्याची संस्कृती आहे. वास्तविक जी संवेदनशीलता सरकारने दाखवायला पाहिजे तिथे सरकार कमी पडलं. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला. म्हणून मी पनवेलच्या रुग्णालयात गेलो होतो. विरोधी पक्षनेता असल्याने तिथे जाणं गरजेचं होतं”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

हेही वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसमधील ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या? अजित पवार स्पष्टीकरण देत म्हणाले…

तसंच, “अजित पवारांच्या संपर्कात ४० आमदार असल्याचीही चर्चा होती. हे आमदार अजित पवारांसोबत बैठक घेत असल्याचंही बोललं जात होतं. यावरून अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, अनेक आमदार मंत्रालयात येत असतात. आजही मी येथे असल्याने आमदार मला येथे भेटायला आले. ही नेहमीचीच पद्धत आहे. त्यात वेगळा अर्थ काढू नका. त्यांची वेगवेगळी कामे घेऊन आले होते, माझंही त्यांच्याकडे काम होतं. परंतु, अशा अफवांमुळे जो पक्षाचा कणा आहे, तो ह संभ्रावस्थेत जातो. काही काळजी करू नका. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आहे. पक्षात अनेक चढउतार आले. ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत. त्या जाणीपूर्वक पसरवल्या जात आहेत. महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्षविचलीत करण्याकरता, बेरोजगारी, अवकाळी पाऊस, पंचनामे न होणे या मुद्द्यांवरून हे लक्ष विचलीत करण्याकरता अशा अफवा उठवल्या जातात”, असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader