Ajit Pawar Gadchiroli Speech : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१७ जुलै) गडचिरोलीत अनेक विकासकामांचं भूमिपूजन केलं. विविध कार्यक्रमांसाठी दोन्ही नेते गडचिरोलीला गेले होते. दोघांनी नागपूरवरून गडचिरोलीपर्यंतचा प्रवास हेलिकॉप्टरने केला. मात्र हा प्रवास अजित पवारांसाठी सोपा नव्हता. सध्या राज्यात मान्सून सुरू असून राज्याच्या विविध भागात ढग दाटून येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरने प्रवास करणं अवघड झालं आहे. अशातच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर या प्रवासादरम्यान खूप उंच ढगात गेलं होतं. त्यामुळे अजित पवारांच्या पोटात गोळा आला होता. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच गडचिरोलीत बोलताना हा गमतीशीर किस्सा सांगितला. अजित पवार म्हणाले, “माझ्या पोटात गोळा आला होता, मात्र देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत प्रवास करत होते आणि मला ते सांगत होते की माझे असे सहा अपघात झाले आहेत. हे ऐकून आणखीनच भीती वाटत होती.”

अजित पवार म्हणाले, “इकडे (गडचिरोलीला) येताना नागपूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना आम्हाला बरं वाटलं. परंतु. हेलिकॉप्टर ढगात शिरल्यावर माझ्या पोटात गोळा आला होता. मी सगळीकडे बघत होतो, मला सर्वत्र ढगच ढग दिसत होते. फडणवीस मात्र निवांत गप्पा मारत बसले होते. मी त्यांना म्हटलं जरा बाहेर बघा, कुठे झाड दिसेना… कुठे काहीच दिसेना… जमीनही दिसेना… आपण ढगात चाललो आहोत. मुळात कुठे चाललोय तेच कळत नाही. ते ऐकून फडणवीस मला म्हणाले, काही काळजी करू नका माझे आतापर्यंत असे सहा अपघात झाले आहेत. मी हेलिकॉप्टर किंवा विमानात असताना माझे अपघात झाले आहेत. परंतु, असे अनेक अपघात झाले तरी मला काहीच झालं नाही. तुम्हालाही काही होणार नाही.”

aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला, “काही लोकांना रोज माझा राजीनामा मागितल्याशिवाय..”
Vehicle Scrapping Policy
तुमची जुनी कार स्क्रॅप केल्यावर मिळणार ‘एवढी’ सवलत, नवीन कार खरेदीवर किती होईल बचत? काय म्हणाले नितीन गडकरी…
Jayant Patil On Raje Samarjeetsinh Ghatge
Jayant Patil : “आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो”, समरजितसिंह घाटगेंच्या पक्ष प्रवेशावरून जयंत पाटलांचा भाजपाला इशारा
Ravindra Chavan, Ramdas Kadam,
रामदास कदमांनी कोकणासाठी ४० वर्षांत कोणते दिवे लावले? सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची खरमरीत टीका
sanjay raut anil deshmukh
Sanjay Raut : “अनिल देशमुख आणि मी जेलमध्ये खिमा पाव बनवायचो”, राऊतांनी सांगितली तुरुंगातील दिनचर्या; कसाबच्या वस्तू पाहून म्हणाले…

इथवर येईपर्यंत मी पांडुरंगाचा जप करत होतो : अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर ऐकून मी त्यांना म्हटलं, फडणवीसजी मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही काय बोलताय, एक तर माझ्या पोटात गोळा आलाय आणि तुमचं काहीतरी भलतंच… आज आषाढी एकादशी असल्यामुळे मी सारखं पांडुरंग.. पांडुरंग.. पांडुरंग… करत इथवर प्रवास केला. मी माझ्या मनातली भीती सांगतोय आणि हे महाराज (देवेंद्र फडणवीस) मला उपदेश देत बसले होते. मला सांगत होते, काही काळजी करू नका आणि खरोखर इथे येईपर्यंत ते निवांत बसले होते.”

Ajit Pawar On NCP Jayant Patil
अजित पवार, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

हे ही वाचा >> “राज ठाकरे महिन्याभराने जागे झाल्यावर…”, शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, “जनता ज्याची दखल…

अन् अजित पवारांनी सुटकेचा निश्वास सोडला

अजित पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस प्रवासादरम्यान मला सांगत होते की मला अशा प्रवासाचा अनुभव आहे, माझे अनेक अपघात झाले आहेत, परंतु कुठल्याही अपघातात माझ्या नखालाही धक्का लागला नाही. अशा पद्धतीने बापजाद्यांच्या पुण्याईमुळे हे महाराज (फडणवीस) इथपर्यंत पोहोचले आहेत. पूर्वजांची पुण्याई निश्चितच त्यांच्या उपयोगी पडली आहे. मित्रांनो मी तुम्हाला खरोखर सांगतो, माझ्यासह सर्वांच्या मनात धाकधुक होती. हेलिकॉप्टरमध्ये माझ्या उजव्या बाजूला उद्योगमंत्री उदय सामंत बसले होते. मी त्यांनाही माझी भीती सांगत होतो. शेवटी गडचिरोली जवळ आल्यावर उदय सामंत मला म्हणाले, दादा जमीन दिसू लागली आहे. जमीन पाहिल्यावर मी म्हटलं, बरं झालं बाबा, आता जमीन दिसतेय. आता आपण सुखरूप पोहोचू शकतो.”