Ajit Pawar Gadchiroli Speech : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१७ जुलै) गडचिरोलीत अनेक विकासकामांचं भूमिपूजन केलं. विविध कार्यक्रमांसाठी दोन्ही नेते गडचिरोलीला गेले होते. दोघांनी नागपूरवरून गडचिरोलीपर्यंतचा प्रवास हेलिकॉप्टरने केला. मात्र हा प्रवास अजित पवारांसाठी सोपा नव्हता. सध्या राज्यात मान्सून सुरू असून राज्याच्या विविध भागात ढग दाटून येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरने प्रवास करणं अवघड झालं आहे. अशातच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर या प्रवासादरम्यान खूप उंच ढगात गेलं होतं. त्यामुळे अजित पवारांच्या पोटात गोळा आला होता. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच गडचिरोलीत बोलताना हा गमतीशीर किस्सा सांगितला. अजित पवार म्हणाले, “माझ्या पोटात गोळा आला होता, मात्र देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत प्रवास करत होते आणि मला ते सांगत होते की माझे असे सहा अपघात झाले आहेत. हे ऐकून आणखीनच भीती वाटत होती.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा