Ajit Pawar On Dhananjay Munde Resignation : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहेत. अशात अनेक राजकीय नेत्यांसह समाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येतील आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप करत, मुंडे यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “पक्ष वगैरे न बघता दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहे.”

अशा घटना खपवून घेणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारले. यावर अजित पवार म्हणाले, “या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याच्यबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले आहे की, पक्ष वगैरे न बघता यामध्ये वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी असतील तर त्यांची गय करण्याचे कारण नाही. ही निर्घून पद्धतीने झालेली हत्या आहे. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही.”

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या केंद्रस्थानी सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप केला जात आहे.

हे ही वाचा : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येला एक महिना होऊनही अद्याप सर्व आरोपींना अटक झालेली नाही. गेल्या आठवड्यात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक करण्यात आली होती. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर ४ जानेवारीला या दोघांना अटक झाली होती. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

Story img Loader