स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एक डायरी सापडली असल्याची माहिती समोर आली आहे. या डायरीमध्ये मातोश्रीला महागड्या भेटवस्तू दिल्याच्या दोन नोंदी असल्याने खळबळ उडाली आहे. यावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ भेटीची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपा प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत व त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडयाळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यावर खेड येथे माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“असल्या गोष्टीला…”; राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको म्हणणाऱ्या सुजय विखेंना अजित पवारांचे प्रत्युत्तर

“तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करेल. अशा प्रकारच्या चौकशा ज्यावेळी होतात त्यावेळी तुम्ही विचारता. पण यामध्ये यशवंत जाधव यांनी मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो असे उत्तर दिले आहे. बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात. काही जण आई म्हणतात तर काही मातोश्री म्हणतात. ते स्वतः सांगत असताना तुम्हा त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात,” असे अजित पवार यांनी म्हटले.

“संजय राऊतांनी माझी केलेली सगळी चेष्टा अंगावर येणार आहे”; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

या संदर्भात यशवंत जाधव यांना प्रश्न विचारला असता, पहिल्या नोंदीमध्ये ५० लाखांच्या घड्याळांचे त्यांनी आईच्या वाढदिवसानिमित्त वाटप केले होते, असे सांगितले. याशिवाय आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी गुढीपाडव्याला गरजूंना दोन कोटी रुपयांच्या वस्तू वाटप केल्याचं सांगितलं. या भेटवस्तू वाटपासाठी आपण मातोश्री लिहिल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांच्यासमोर दोन कोटी रुपयांची नोंद करण्यात आली. २५ फेब्रुवारीला प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ही डायरी सापडली होती. यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.