राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. पुण्यापासून सुरू होणाऱ्या या पद यात्रेचा समारोप नागपूरला होणार आहे. या पदयात्रेचं एकूण अंतर सुमारे ८०० किलोमीटर असून ५४ दिवसांचा हा प्रवास असणार आहे. युवकांचे विविध प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या युवा संघर्ष यात्रेवरून अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.

रोहित पवार युवा संघर्ष यात्रा काढत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. ते महाराष्ट्रात फिरले तर त्यांना राज्यात किती अडचणी आहेत, हे समजील. विरोधी पक्षात बसून बोलण्यापेक्षा आणि टोमणे मारण्यापेक्षा हे किती अवघड आहे, हे त्यांना येणाऱ्या काळात कळेल, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे. ते गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
लक्षवेधी लढत : लेकीपेक्षा एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणास
nana patole latest marathi news
“‘शेटजी-भटजी’च्या पक्षाला ओबीसी नेत्यांनी मोठे केले”, पटोले म्हणतात, “बावनकुळेंनी अपमान सहन करण्यापेक्षा…”
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Loksatta chavadi political drama in maharashtra
चावडी: बंटी पाटील एवढे का संतापले?

हेही वाचा- “…तर लगेच मराठा आरक्षणाची घोषणा होईल अन् ब्रेकिंग न्यूज येईल”, मनोज जरांगेंचं सूचक विधान

रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेबद्दल विचारलं असता प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ते संघर्ष यात्रा काढतायत, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला अशा यात्रा काढण्याचा अधिकार आहे. ते राज्यात फिरले तर उत्तमच आहे. त्यांनाही महाराष्ट्र किती मोठा आहे, राज्यात किती अडचणी आहेत? हेही त्यांच्या हळूहळू लक्षात येईल. आतापर्यंत त्यांनी एक वेगळं राजकारण केलं आहे. आता त्यांना अशाप्रकारचंही राजकारण करू द्या. महाराष्ट्रात किती प्रश्न आहेत, हेही त्यांना नक्की समजेल. विरोधात बसून केवळ बोलण्यापेक्षा आणि टोमणे मारण्यापेक्षा किती अवघड आहे, हे येणाऱ्या काळात त्यांच्या लक्षात येईल.”

हेही वाचा- शिंदे गटाच्या मंत्र्याची मनोज जरांगेंनी महत्त्वाची विनंती; मराठा आरक्षण देण्याबाबत केलं सूचक विधान

दरम्यान, रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (२४ ऑक्टोबर) सरकारला इशारा दिला. युवा संघर्ष यात्रा ही तरुणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी आहे. ही नव्या पिढीची दिंडी आहे. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं विधान शरद पवार यांनी यावेळी केलं.