राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा काल बारामतीत राज्यव्यापी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिले होते. ते शरद पवारांच्या फोनवरूनच गैरहजर राहिल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. मात्र, काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आणि आज ते शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी का गेले? छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात राजकीय नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे. “बारामतीमधील मेळाव्यात आम्ही सर्वजण बरोबर होतो. तोपर्यंत काहीही चर्चा झाली नव्हती”, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Chhagan Bhujbal On Amit Shah
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”
Sharad Pawar on Uday Samant
Sharad Pawar: पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, “मी वाट बघतोय…”
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”
Vinayak Raut On Shinde Group Ajit Pawar Group
Vinayak Raut : “शिंदे गट आणि अजित पवार गटाला लवकरच…”, ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बारामतीमधील मेळाव्यात आम्ही सर्वजण बरोबर होतो. तोपर्यंत काहीही चर्चा झाली नव्हती. तसेच शरद पवार हे देशाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीला कोणीही जाऊ शकतं. आता छगन भुजबळ कोणत्या कारणासाठी भेटीसाठी गेले आहेत? हे छगन भुजबळांशिवाय कोणीही काही सांगू शकणार नाही”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमागे मराठा आणि ओबीसी आरक्षणाची काही पार्श्वभूमी आहे का? तसेच राज्यसभा आणि लोकसभेतील उमेदवारी न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याचीही चर्चा आहे. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “छगन भुजबळ जोपर्यंत हे स्वत: याबाबत माहिती देत नाहीत तो पर्यंत काहीही सांगता येणार नाही. आता काही लोक असा अर्थ काढत आहेत की छगन भुजबळ नाराज आहेत. मग त्यांची ही भेट कशासाठी? त्यांची भेट ठरली होती का? आता मिलिंद नार्वेकर हे देखील शरद पवारांची भेट घेत आहेत. मग विधानपरिषदेत शरद पवार यांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि मिलिंद नार्वेकर निवडून आले. मग तरीही मिलिंद नार्वेकर हे भेट घेत असतील मग याचा अर्थ काय लावायचा?”, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.

“विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एखाद्या आमदाराने क्रॉस मतदान करून मिलिंद नार्वेकरांना निवडून आणलं का? असाही प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाड क्रॉस मतदान करत ते मत नार्वेकरांना दिलं अशीही चर्चा आहे. त्यामुळे याबाबतही चर्चा होऊ शकते. शरद पवार हे मोठे नेते आहेत, काल ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता छगन भुजबळ हे का भेटीसाठी गेले आहेत, याबाबत तेच सांगू शकतील”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Story img Loader