शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात धुसफूस निर्माण झाली आहे. पुरंदरचे माजी आमदार असलेल्या विजय शिवतारेंना २०१९ साली पाडून दाखवतो, असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी दिले होते आणि त्याप्रमाणे शिवतारेंचा पराभवही झाला. आता शिवतारे आणि अजित पवार महायुतीचे घटक असले तरी बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विजय शिवतारे आपल्या विधानसभेची उमेदवारी भक्कम करत असल्याचे बोलले जाते. शिवतारेंनी बारामती लोकसभा लढविण्याचे जाहीर केल्यानंतर अजित पवार गटाकडून त्याला प्रत्त्युतर देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे मूकदर्शक का बनलेत?

विजय शिवतारेंचा समाचार घेण्यासाठी माजी खासदार आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, शिवतारेंनी आपल्या पत्रकार परिषदेत स्वतःला मुख्यमंत्री यांचे निष्ठावान असल्याचे म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता याचा खुलासा करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवराळ शिवतारे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. या सर्व घडामोडींचे मुख्यमंत्री मूकदर्शक बनले आहे. शिवतारेंना समज देण्यात आली आहे का? त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? हेदेखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले आहे.

“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय”, अजित पवारांचं नाव घेत विजय शिवतारेंचा हल्लाबोल; म्हणाले, “त्यांनी नीच पातळी गाठली!”

मग शिंदेशाहीदेखील पराभत करायची का?

सूनेत्रा पवार यांना मतदान का करावे? असाही प्रश्न विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला होता. त्यावर पलटवार करताना परांजपे म्हणाले की, २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते, हे विचारले पाहिजे होते का? जर पवारांची घराणेशाही संपविण्याचे आवाहन शिवतारे करत असतील तर आम्ही ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही पराभूत करायची का? असाही प्रश्न ठाणेकर जनता विचारू शकते. त्यामुळे आता वेळ आली आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना आवर घालून त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.

अहमदनगर शहराचे नाव आता ‘अहिल्यानगर’, तर पुण्यातली वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’, सरकारचा निर्णय

विजय शिवतारे काय म्हणाले?

विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणूक ‘नमो विचारमंच’ या नावाखाली लढवणार असल्याचे सांगितले. “प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही लढाई मी लढतोय. मी महायुतीच्या विरोधात नाही. मी एकनाथ शिंदेंचा शिलेदार आहे. देवेंद्र फडणवीसांना गुरू मानणारा माणूस आहे. नरेंद्र मोदींशी निष्ठा असणारा मी माणूस आहे. मी बंडखोरी केलेली नाही. इथे पवार विरुद्ध पवार हाच सामना चालू आहे. विरोधातल्या ५ लाख ८० हजार मतदारांनी जायचं कुठे?” असा प्रश्न विजय शिवतारे यांनी उपस्थित केला.