राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर दोन्हीकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात येत असते. राष्ट्रवादीत वयस्कर नेत्यांनी तरुणांना संधी दिली नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी “अजित पवार कुठून आले?” असा प्रश्न उपस्थित केला होता. अजित पवारांना मीच पहिल्यांदा तिकीट दिले, संधी दिली, असेही शरद पवार यांनी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते. त्यानंतर आता सोलापूर येथेच अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटाची भूमिका मांडली आहे.

शरद पवार मोठे झाले कारण…

“अजित पवारांना तिकीट शरद पवार यांनीच दिले. त्याप्रमाणेच सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि सर्वच आमदारांना शरद पवारांनीच तिकीट दिले. हे कुणीही नाकारणार नाही. शरद पवारांनी तिकीट दिल्यानंतर या सर्व नेत्यांनी तो विश्वास सार्थ करून दाखविला. त्यामुळे शरद पवार यांचे नेतृत्व मोठे झाले. पवारांमुळे जसे इतर नेते मोठे झाले, तसेच बाकीच्या नेत्यांच्या कष्टावर शरद पवारदेखील मोठे झाले, हेही तितकंच खरं” अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नवनियुक्त मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”

हे वाचा >> ‘तरुणांना संधीच दिली नाही’ या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले; “अजित पवार कुठून….”

उमेश पाटील यांनी पक्षाअंतर्गत हुकूमशाहीवर भाष्य केले. नुकतेच सुनील तटकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या शपथपत्रात शरद पवार पक्षात हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचे म्हटले, अशी बातमी वृत्तवाहिन्यांनी चालविली होती. उमेश पाटील हुकूमशाहीवर बोलताना म्हणाले, “शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाला, हे कुणीही नाकारत नाही. राजकीय पक्ष ही लोकतांत्रिक व्यवस्था आहे. घटनात्मक तरतुदीने लोकशाही प्रक्रियेने राजकीय पक्षाची स्थापना होत असते. त्यामुळेच राजकीय पक्षाला दर तीन वर्षांनी अंतर्गत निवडणुका घ्याव्या लागतात. जर पक्ष खासगी मालमत्ता असती, तर त्याला निवडणूक घेण्याची गरज भासली नसती.”

अजित पवारांनी भाजपाला दिलेले शब्द पाळला

“अजित पवार यांनी एनडीएचा घटक पक्ष होण्याचा निर्णय एकाएकी घेतलेला नाही. २००४, २०१४, २०१७ आणि २०१९ साली ज्या ज्या वेळी एनडीएला पाठिंबा देण्याची चर्चा झाली. तेव्हा पक्षातील सर्व नेत्यांनी त्यासाठी एकमत दर्शविले होते. २०१७ साली सर्व आमदारांच्या सह्याचे पत्रच दिले गेले होते. तसेच २०१९ साली सकाळी आठ वाजता झालेल्या शपथविधीलाही शरद पवारांसह पक्षाची मान्यता होती. त्यामुळे अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपाला जो शब्द दिला गेला, त्याचीच अंमलबजावणी त्यांनी केली” असा खुलासाही उमेश पाटील यांनी केला.

‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’, या दाव्यावर शरद पवार गटाची टीका; म्हणाले, “सरकार तुमचाच घात…”

विचारधारा न सोडता एनडीएमध्ये सामील

“आम्ही एनडीएचे घटक पक्ष झालो, याचा अर्थ विचारधारेला तिलांजली दिली, असे होत नाही. बिहारमध्ये नितीश कुमार दहा वर्ष एनडीएच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होते. ममता बॅनर्जी, मायावती, दक्षिणेतील जयललिता, स्टॅलिन, ओडिशातील बिजू जनता दल यांनीही वेळोवेळी एनडीएचा पाठिंबा घेऊन सरकार चालविले आहे. हे करत असताना त्यांनी आपली विचारधारा कधीही सोडली नव्हती. आम्हीही आमची विचारधारा सोडलेली नाही”, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

Story img Loader