Ajit Pawar : उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टरबूज असा केला. तसंच मी आता अमित शाह यांना अहमदशाह अब्दाली असं म्हणणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी ढेकूण असाही केला होता. ठाकरे-फडणवीस वादावर आता अजित पवारांनी ( Ajit Pawar ) भाष्य केलं आहे. बारामतीतल्या सांगवी या ठिकाणी अजित पवार ( Ajit Pawar ) बोलत होते.
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांबाबत काय म्हणाले?
आता लढाई मैदानात आहे, मी मुंबईत म्हणालो की एक तर मी तर राहीन किंवा तू तरी राहशील. इथे एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आव्हान दिलेय. पण, ढेकणांना आवाहन द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं. मी आव्हान द्यावं इतका मोठा तू नाहीस. काहीजणांना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. तर हे आव्हान चोर-दरोडेखोरांच्या पक्षाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती.
देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय?
“उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत निराशेत आहेत. त्या निराशेतून ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत त्यावर आपण काय उत्तर द्यायचं? फर्स्टेशनमध्ये जो माणूस डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्याला उत्तर द्यायचं नव्हतं. मात्र भाषण करुन उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं जे अमित शाह म्हणाले होते. अमित शाह त्यांच्याबद्दल म्हणाले होते की ते औरंगजेब फॅन क्लबचेच सदस्य आहेत. उद्धव ठाकरेंनी भाषण करुन ते दाखवून दिलं. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.
अजित पवार ठाकरे फडणवीस वादावर काय म्हणाले? ( What Ajit Pawar Said? )
मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो आहे. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. फाफटपसारा सांगणार नाही, पण आता कोण कुणाला ढेकूण म्हणत आहेत. एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पाच ते सहा वेळा एफआरपी वाढला पण MSP वाढला नाही. ४० रुपयापर्यंत साखरेचे दर करून द्या, अशी मागणी आम्ही केली आहे. वाढवणजवळ आम्ही विमानतळ करणार आहोत. असं अजित पवार ( Ajit Pawar ) त्यांच्या भाषणात म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.