केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल देत शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे. त्यानंतर शिंदे गटाने राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे. या निर्णयानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते प्रतिक्रिया नोंदवत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा अतिशय अनपेक्षित असा निकाल आलेला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच आजच सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचे सांगितले होते, असे असतानाही निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? हे कळायला मार्ग नाही. परंतु निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला तरी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जातील आणि तिथे न्याय मागतील”, असे माझे मत आहे.

हे वाचा >> “निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला”, संजय राऊत यांची घणाघाती टीका, म्हणाले, “४० बाजारबुणगे विकत घेतात..”

uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
maharashtra assembly election 2024 amit thackeray sada saravankar mahesh sawant dadar mahim assembly constituency
लक्षवेधी लढत : दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray challenges election commission to inspect modi and shahs bags
मोदी, शहा यांच्याही बॅगा तपासा; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आव्हान
wani vidhan sabha constituency BJP kunbi statement bag inspection
वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

“महाराष्ट्रातला शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठिशीच उभा राहिल आणि त्यांच्या विचारांचेच उमेदवार निवडून येतील, असे माझे ठाम मत आहे. मी आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करत आहे म्हणून हे मत नाही, तर एक त्रयस्थ नागरिक म्हणून मला हे वाटतं. वास्तविक शिवसेना कुणी स्थापन केली? शिवसेनाप्रमुख कोण होते? बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कोण सांभाळत होतं, त्याचे निर्णय कोण घेत होतं. शिवसेनेचे मंत्रीपद कोण वाटत होतं, शिवसेनेचे सर्व निर्णय मातोश्रीवरुन होत होते. खरी शिवसेना मातोश्रीवरुन चालवली जात होती.”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

हे वाचा >> शिवसेना पक्ष, धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणूक आगोयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “चोर…”

मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो तेव्हा सर्वसामान्य शिवसैनिक आणि सामान्य जनता ही उद्धव ठाकरे यांना माननारी आहे. त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना हे निवडणुकीत सिद्ध होईल, असेही अजित पवार म्हणाले.