केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल देत शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे. त्यानंतर शिंदे गटाने राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे. या निर्णयानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते प्रतिक्रिया नोंदवत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा अतिशय अनपेक्षित असा निकाल आलेला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच आजच सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचे सांगितले होते, असे असतानाही निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? हे कळायला मार्ग नाही. परंतु निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला तरी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जातील आणि तिथे न्याय मागतील”, असे माझे मत आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खरी शिवसेना मातोश्रीवरुन…”
उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, हे निवडणुकीत सिद्ध होईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-02-2023 at 21:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar first reaction to the election commission verdict on the bow and arrow symbol and shiv sena name to eknath shinde kvg