उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बंड केलेल्या आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे. मी पक्षातून बाहेर पडतो. तुम्ही परत या, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. याला अजित पवार यांच्या गटातील नेते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, “तुम्हाला वाटत असेल, माझ्यासारखी व्यक्ती बाहेर पडल्यानंतर पक्ष खूप वाढणार आहे. तर, मी बाहेर पडतो. माझ्यासह जयंत पाटील यांनाही बाहेर घेऊन जाईन.”
हेही वाचा : मुंबईत पराभव झाल्यानंतर येवल्यातून निवडून आणलं, भुजबळांनी जाण ठेवली नाही? शरद पवार स्पष्ट करत म्हणाले…
“जयंत पाटील आणि आमच्यावर टीका केली जाते की, बडव्यांनी शरद पवार यांना घेरलं आहे. या बडव्यांना राहायचं नाही आहे. आम्हाला काहीच नको आहे. आम्ही सोडून जातो. तुम्ही परत या. शरद पवारांना त्रास देऊ नका,” अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
हेही वाचा : “दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ…”, अमित ठाकरेंचं विधान
याला आनंद परांजपे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “आधीच योग्य वागले असते, तर ही वेळ आली नसती. वांद्र्यात झालेल्या सभेत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्टेजवरून अजित पवार वारंवार शरद पवारांना आशीर्वाद देण्यासाठी विनंती करत होते,” असं आनंद परांपजे यांनी म्हटलं आहे.