अजित पवार गटाच्या आमदारांनी आज पुन्हा शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी आज पुन्हा भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, “शरद पवारांनी याचा खुलासा केला आहे की त्यांना भाजपासोबत जाता येणार नाही. जयंत पाटलांनीही याबाबत खुलासा केला आहे. आता सगळं संपलेलं असताना पवार साहेबांना पुन्हा पुन्हा भेटायचं म्हणजे पवार साहेबांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा हे बरोबर नाही.”

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
gulabrao deokar loksatta news
शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
sharad pawar elected guest president for 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan
शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष… हे पद किती महत्त्वाचे?
Harshvarrdhan Patil Meets Devendra Fadnavis
Harshvarrdhan Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन; चर्चांना उधाण

त्या पुढे म्हणाल्या की, “पवारांना अशाप्रकारे त्रास देणं बरोबर नाही. तुमच्या हृदयात पवार साहेब असते तर तुम्ही असा मार्ग निवडलाच नसता. कारण, पवार साहेबांच्या नावावर सगळे आमदार निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या हृदयातून पवार साहेबांना काढून टाकलं आणि मोदींची प्रतिमा तयार केली आहे. मोदींसोबत पवारांना जाता येत नाही. सर्वधर्म समभाव मानणारे पवार मोदींसोबत जाऊ शकत नाही हे माहीत असताना त्यांना भेटायला जाणं हे बरोबर नाही”, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या.

कालही घेतली होती भेट

दरम्यान, कालही अजित पवार गटाच्या आमदारांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार सेंटरमध्ये आल्याचं समजताच त्यांची वेळ न घेता त्यांची भेट घेण्यात आली. शरद पवारांचे मार्गदर्शन घेण्याकरता आणि संभाव्य युती करण्याकरता शरद पवारांनी विचार करावा याकरता शरद पवारांची भेट घेतली असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं. त्यानंतर, आज पुन्हा अजित पवार गटाचे नेते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांना तिथे बोलावून घेतलं असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप होतोय का हे पाहावं लागणार आहे.

Story img Loader