राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार जवळपास वर्षभर रखडला आहे. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार तत्काळ करण्यात आला होता. ज्यांना खाती मिळाले नाही त्यांना लवकरच खाती दिली जातील, असं आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. परंतु, हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन उलटल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. तसंच, राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांचंही खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली पण खातेवाटप झालेलं नाही. शपथ घेतल्यानंतर २४ तासांत खातेवाटप करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे असे टोलेजंग नेते राष्ट्रवादीतून घेतल्यावरही त्यांना बिनखात्याचं ठेवलं आहे. अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. छगन भुजबळ बिनखात्याचे मंत्री आहेत, धनजंय मुंडे बिनखात्याचे मंत्री आहेत, हसन मुश्रीफ बिनखात्याचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार खातेवाटप करू शकत नाही”, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

उद्धव ठाकरे कधीच खोटं बोलत नाहीत

“अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली होती. याबाबत उद्धव ठाकरे यांनी शपथ घेऊन सांगितलं आहे. आम्ही धार्मिक, अध्यात्मवादी आणि शब्दाला जागणारे आहोत. सत्ता, खुर्चीसाठी आम्ही आमच्या शब्दाला विकत नाही. आमच्या आईला विकत नाहीत. खोटे वादे करत नाहीत. भाजपा खोटं बोलत आहे, हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. भाजप पक्ष किती खोटा आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतंय. उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ज्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे ते खूपच महत्त्वपूर्ण आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

“उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भ दौऱ्याची सुरुवात यवतमाळच्या जागृत देवस्थान पोहरादेवीपासून झाली. पोहरादेवीची शपथ घेऊनच त्यांनी सांगितलं की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची चर्चा अमित शाहांच्या उपस्थितीत मातोश्रीत झाली होती. पोहरादेवीत शपथ घेऊन सांगतात यातच सगळं आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्थितरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे परिवाराला सत्तेची भूक नाही. ठाकरेंना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल पदाची गरज लागली नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी राजकारण केलं असा आरोप केला जातो हे खोटं आहे. आता आरोप करणारे तेव्हा कोणत्याही चित्रात नव्हते. आम्ही होतो, आम्हाला माहितेय. उद्धव ठाकरे जे सांगतात ते सत्यच आहे. कारण उद्धव ठाकरे कधीच खोटं बोलत नाहीत”, असाही पुनरूच्चार संजय राऊतांनी केला.