राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहिले असून जनतेला संबोधित केले आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी अजित पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं म्हटलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण? पक्ष कोणाकडे आहे? हा सगळ्या जनतेचा महासागर पाहिल्यानंतर हे सिद्ध होतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्यासोबत आहे. त्याचे अध्यक्ष अजित दादा आहेत”, असं छगन भुजबळ म्हणाले.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

हेही वाचा >> “शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिलं?” धनंजय मुंडे यांचा थेट हल्लाबोल

“पवारांनी बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत छगन भुजबळ, दुसऱ्या बैठकीत धनजंय मुंडे, तिसरा नंबर हसन मुश्रीफ यांचा. इकडून गाडी बारामतीहून फिरून आली की अजितदादा आमचे नेते आहेत. आमच्याविरोधात मीटिंग झाल्यानंतर बारामतीचा प्रश्न आला की अजित पवार आमचे नेते आहेत असं शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणणार. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता देऊन टाका आणि मिटवून टाका भांडण, नेते आहेत ना तुमचे!” असंही छगन भुजबळ म्हणाले.

“जयंत पाटील दिल्लीला जायचे, चर्चा करायचे. आम्हाला एवढे आमदार-खासदार पाहिजेत. एवढी आमची कामं आहेत. त्यात मी नव्हतो, मुंढेही नव्हते. मग आता काय झालं?”, असा सवाल भुजबळांनी केला.

त्यावेळी छगन भुजबळ तुमच्याबरोबर होता

“आमच्या येथे साहेब म्हणाले की, मी माफी मागायला आलोय, चूक झाली. काय चूक झाली तर भुजबळांना उभं केलं. अरे भुजबळ चारवेळा निवडून आला. पवार माफी मागतो म्हणाले. माफी मागायची असेल तर गोंदियापासून कोल्हापूरपासून कुठे कुठे माफी मागणार? हा रस्ता दाखवला कोणी? साहेब हा रस्ता तुम्ही दाखवला”, असं छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा >> “दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स…”, छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “तुम्हाला शोभत…”

“२०१९मध्ये अजित दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तुम्ही सांगितलं की ती गुगली होती. ही कसली गुगली? स्वतःच्याच प्लेअरला आऊट करायचं का? राजकारणात अशा गुगल्या असतात का?”, असा हल्लाबोलही त्यांनी केला. “आम्ही लढत होतो, आमच्यावरही ईडीची कारवाई झाली, छगन भुजबळ अडीच वर्षे आतमध्ये गेला. बाहेर आल्यावर पुन्हा तुमच्यासोबत उभा राहिलो. तुम्ही म्हणता घाबरले म्हणून गेलो. छगन भुजबळ तुमच्यासोबत राहिला. १९९१ पासून तुमच्यासोबत आहे, ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर काढलं तेव्हा कोणी नव्हतं तेव्हा छगन भुजबळ पहिला माणूस होता जो तुमच्याबरोबर उभा राहिला”, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Story img Loader