बारामती : गेली अनेक वर्षे आपण वरिष्ठांच्या ( ज्येष्ठ नेते शरद पवार) विचारांना मान देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी केले. यापुढील काळात मात्र अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे, असे समजून मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये रविवारी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

मी केलेल्या विकासकामांची पावती द्यायची असेल तर या लोकसभेला मी उभा करेन त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, भावनिक न होता बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने कोण उमेदवार विकासाचे प्रकल्प राबवू शकेल, याचा विचार करून बारामतीकरांनी मतदानाचा निर्णय घ्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

हेही वाचा >>>“पंतप्रधान मोदी रोज दोन-तीन किलो शिव्या खातात, मग आम्ही..”, भाजपा नेत्यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

नुसतेच शेवटची निवडणूक म्हणतात पण शेवटची निवडणूक केव्हा होईल, हेच समजत नाही, असे वक्तव्य त्यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून केले.बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी राज्याच्या योजनांबरोबरच पंतप्रधानांकडे आग्रह करून केंद्राच्याही योजना आणू, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

Story img Loader