Ajit Pawar Ladki Bahin Yojana : उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच त्यांच्या भाषणाच्या खुमासदार शैलीने सभा गाजवत असतात. अशात आजही अजित पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी वाचवले असे म्हटले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक, विधानसभा, ईव्हीएमवरील आरोप या सर्व विषयांवर भाष्य करत विरोकांना प्रत्युत्तर दिले. तसेच, ईव्हीएम मशीन मध्ये घोळ असल्याचे सांगून विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचेही अजित पवारांनी म्हटले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीतून अजित पवार यांच्या पक्षाला लढण्यासाठी अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. त्यातील एका जागेवर विजय मिळाला होता. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाने ५१ जागा लढवत ४१ जागांवर विजय मिळवला. दरम्यान महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामागे लाडकी बहीण योजना असल्याचे सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी अनेकवेळा म्हटले आहे.

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव

काय म्हणाले अजित पवार?

बारामतीतील कार्यक्रमात विविध विषयांवर बोलताना आपल्या भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री उपस्थितांचे आभार मानत होते. त्यावेळी कार्याक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांकडे पाहत अजित पवार म्हणाले, “माझ्या लाडक्या बहिणींनी मला वाचवले यावेळेस. मी खोटे नाही बोलत, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर विचार करत होतो की, आपले सरकार यायला पाहिजे. नाहीतर बरोबर आलेले ४०-५० आमदार म्हणतील हे घेऊन गेलं आणि आमचं वाटोळं केलं. आम्ही महिलांसाठी चांगल्या चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे बहिणींनी स्वागत केले. त्यामुळे आमच्या बहिणींनी मेहुण्यांचे पण ऐकले नाही. आत जाऊन जे बटन दाबायचे होते ते दाबले. आमच्या मेहुण्यांनी दुसरीकडेची बटनं दाबली, पण इकडून बटनं जोरात दाबल्यामुळे आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आलो.”

हे ही वाचा : “…पण, आतापर्यंत फोन आला नाही”, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवेंद्रराजेंनी काय सांगितले?

लाडकी बहीण योजनेचा महायुतीला लाभ

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकत जोरदार कामगिरी केली होती. तर, सत्ताधारी महायुतीच्या वाट्याला १७ जागाच आल्या होत्या. त्यानंतर महायुती सरकारने राज्यात महिलांना अर्थिक सहाय्य करणारी लाडकी बहिण योजना सुरू केली होती. दरम्यान या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा लाभ झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये महायुतीने २३० हून अधिक जागा जिंकत प्रचंड मोठा विजय मिळवला होता. इतकेच नव्हे तर सत्ताधारी पक्षांतील अनेक नेत्यांनी लाडकी बहिण योजनेचा त्यांना फायदा झाल्याचे म्हटले आहे.

Story img Loader