Ajit Pawar Mahayuti CM Candidate for Assembly Election 2024 : राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. विविध पक्षांचे नेते राज्यभर दौरे करत आहेत, मेळावे आणि सभा घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार याबाबतीत आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ‘लाडकी बहीण योजने’च्या प्रचारासाठी ते राज्यभर फिरत आहेत. दरम्यान, अजित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील असे दावे अजित पवारांच्या पक्षातील नेते करत आहेत. मात्र महायुतीने अद्याप त्यांचा महायुतीचा चेहरा कोण असेल ते ठरवलेलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय कोणत्या आधारावर घेणार? जागांच्या आधारावर की स्ट्राईक रेटचा विचार करून निर्णय घेतला जाणार? अजित पवार गटाने महायुतीमध्ये किती जागांची मागणी केली आहे आणि अजित पवार गटाला विधानसभेच्या एकूण किती जागा मिळतील? अशा काही प्रश्नांची अजित पवार यांनी उत्तरं दिली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा