एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असताना नव्या सरकारमध्ये नवी गणितं जुळत असल्याचं दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात भाजपाचे अनेक नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आले. नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ‘गणपती दर्शना’साठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर जाऊन त्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजपा-मनसे युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर बोलताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. शिवसेनेच्यचा दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर अजित पवारांनी बाळासाहेबांच्या विधानाची आठवण करून दिली आहे. “वर्षानुवर्ष सगळी महाराष्ट्रातली जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना जेव्हापासून झाली, तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा तिथे व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल”, असं अजित पवार म्हणाले.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

दसरा मेळाव्याच्या वादावर मांडली भूमिका

“ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना हव्या त्या गोष्टी करत असतात. वाद तर घालून चालणार नाही. शेवटी संख्येच्या प्रमाणात जनता कुणाच्या पाठिशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच लक्षात येईल. आणि निवडणूक झाल्यानंतर कळेलच की कुणाची शिवसेना खरी आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

“बाळासाहेबांनी त्याच शिवाजी पार्कवरून सांगितलं होतं, की इथून पुढे…”, अजित पवारांनी करून दिली ‘ती’ आठवण!

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी सध्या सुरू असलेल्या भाजपा नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठींवर टोलेबाजी केली. “तुम्हीच ओळखा..याआधी गणेशोत्सव वर्षानुवर्ष चालत आले आहेत. पण कधीही मागच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी गणपतीच्या दर्शनाला कुणाच्या घरी गेले नाहीत. आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला?”, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

“पूर्वी राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचा, आता..”

“जो गणेशभक्त आहे, त्याने अशा पद्धतीने देखावा करण्याचं कारण नाही. तुम्ही तुमच्या मनात ठेवा ना. पण आता काहींना शो करण्याचीच सवय आहे. राज कपूर पूर्वी शोमॅन म्हणून ओळखला जायचा. तशी सवय काहींना आता लागली आहे. जनतेनंच बघावं काय चाललंय आणि काय नाही”, असंही अजित पवार म्हणाले.