Ajit Pawar Says Vilasrao Deshmukh Was best CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल. महाराष्ट्रात मुख्य लढत या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. अजित पवारांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केले, त्यापैकी सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव घेतले आहे. त्यांनी यासाठीचं कारण देखील सांगितले. विलासराव देशमुख उत्तमरित्या, योग्य समन्वय राखत आघाडी सरकार चालवत असे अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या या उत्तरामुळे त्यांचा इशारा नेमका कुणाकडे होता, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका

सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण?

विधानसभा निवडणुकीत जर महायुतीला विजय मिळाला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार की इतर कोणी? अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. यातच तुम्ही यापूर्वी अर्धा डझनपेक्षा जास्त मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम केले आहे, यापैकी सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण होते? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी सांगितले की, हे खरे आहे की, मी अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. मा‍झ्या मते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. सध्याचा काळ युतीच्या राजकारणाचा आहे आणि अशावेळी कोणत्याही एका पक्षाची सत्ता देशात किंवा राज्यात येणे शक्य नाही. विलासराव देशमुख यांनी आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याची रणनीती तयार केली होती, असे पवार म्हणाले.

हेही वाचा>> Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…

विधासभेला महायुती किती जागा जिंकेल?

याबरोबरच अजित पवार यांनी यावेळी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचेदेखील स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल, असेही अजित पवार म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल विचारले असता, महायुती एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहे. १७५हून अधिक जागा जिंकण्यात कुठलीही अडचण येणार नाही. सत्ता कायम ठेवण्याचा आमचा निर्धार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आहे, मतदार महायुतीला कौल देतील. जनतेला कळून चुकले आहे की महायुतीच त्यांची कामे करेल. लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचा घटक ठरलेले मुद्दे विशेषतः आरक्षणाचा मुद्दा हा बदलेला आहे, ज्यामुळे महायुतीची कामगिरी सुधारण्यास मदत होईल.

Story img Loader